PM Modi Saam TV
महाराष्ट्र

Govt Job News : देशातील 71000 तरुणांना सरकारी नोकरीचं नियुक्ती पत्र आज वितरित करणार, पंतप्रधान मोदीही राहणार उपस्थित

Narendra Modi Distribute 71000 Appointment Letters: रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे.

साम टिव्ही ब्युरो

New Delhi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 13 एप्रिल 2013 रोजी सकाळी 10.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नव्याने भरती झालेल्यांना सुमारे 71 हजार नियुक्तीपत्रे वितरित करणार आहेत. देशभरातील 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 45 विविध ठिकाणी उपस्थित असलेल्या उमेदवारांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधान संबोधित करतील.

नांदेड येथे केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील 13 एप्रिल 2023 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय संकुलातील नियोजन भवनातील मुख्य सभागृहात रोजगार मेळा योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या नवनियुक्त उमेदवारांना नियुक्ती पत्रे सुपूर्द करतील. यावेळी नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

रोजगार मेळावा हे रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या पंतप्रधानांच्या वचनबद्धतेच्या पूर्ततेच्या दिशेने एक पाऊल आहे. रोजगार मेळावा रोजगार निर्मितीला चालना देण्यात उत्प्रेरक म्हणून काम करेल आणि तरुणांना त्यांच्या सक्षमीकरणासाठी आणि राष्ट्रीय विकासात सहभागी होण्यासाठी अर्थपूर्ण संधी प्रदान करेल अशी अपेक्षा आहे. (Latest Political News)

देशभरातून निवडलेले नवनियुक्त उमेदवार केंद्र सरकारच्या अंतर्गत ट्रेन मॅनेजर, स्टेशन मास्टर, सीनियर कमर्शियल कम तिकीट क्लर्क, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, कॉन्स्टेबल, स्टेनोग्राफर, कनिष्ठ लेखापाल, पोस्टल असिस्टंट, इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर , कर सहाय्यक, वरिष्ठ ड्राफ्ट्समन, जेई/ सुपरवायझर , सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल, परिचारिका, प्रोबेशनरी ऑफिसर , पीए, एमटीएस सारख्या विविध पदांवर रुजू होतील.

नवनियुक्त उमेदवारांना कर्मयोगी प्रारंभद्वारे प्रशिक्षण घेण्याची संधी देखील मिळेल. कर्मयोगी प्रारंभ हा विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी एक ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम आहे.

उद्या दक्षिण मध्य रेल्वेवरील सिकंदराबाद, विजयवाडा, गुंटकल आणि नांदेड या चार ठिकाणी रोजगार मेळावा होणार आहे,अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या जन संपर्क अधिकाऱ्याने कळवले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: अपघाताचा थरार! भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडलं; बापलेकीचा जागीच मृत्यू

Maharashtra Weather : गणेश विसर्जनाच्या दिवशी राज्यात कोसळधार, कोकणाला ऑरेंज अलर्ट; कुठे कसा पाऊस?

Budh-Mangal Yuti: 18 महिन्यांनी होणार बुध-मंगळचा दुर्मिळ संयोग; 'या' राशींचं भाग्य उजळणार

Maharashtra Live News Update: यवतमाळ जिल्ह्यात डेंगीचे 119 रूग्ण, मलेरियाचे 64 रूग्ण

Maiya Sanman Yojana: या राज्यातील महिलांना दर महिन्याला मिळतात ₹२५००; पैसे आले की नाही; असं करा चेक

SCROLL FOR NEXT