Bhusawal crime news  saam tv
महाराष्ट्र

Bhusawal Crime News: धक्कादायक! नववीच्या विद्यार्थ्याकडे आढळले पिस्तुल; शाळेसह परिसरात खळबळ

Bhusawal Crime news: विद्यार्थ्यांच्या दप्तरात अल्युमिनियम या धातूचे पिस्तुल आढळून आल्याची घटना घडली आहे.

संजय महाजन

Jalgaon News: जळगावच्या भुसावळमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. जळगावच्या भुसावळ शहरानजीक तापी नदीच्या काठावर अकलूद शिवारात असलेल्या एका शाळेमधील इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तर तपासणी केली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या दप्तरात अल्युमिनियम या धातूचे पिस्तुल आढळून आल्याची घटना घडली आहे. या घटनेने शाळेसह परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

शाळा प्रशासनाने ताबडतोब पोलिसांना ही माहिती दिली असता फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. कुणाल सोनवणे यांनी सहकाऱ्यांसह येऊन हे पिस्तुल जप्त केले. तसेच हा विद्यार्थी हा अल्पवयीन असल्याने त्याच्याकडून माहिती घेतली जात आहे. शाळेचे मुख्याध्यापक फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात संदर्भात कारवाई सुरू आहे पुढील तपास पोलीस करीत आहे. (Jalgaon Crime News)

नेमकं काय घडलं?

शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्याकडे पिस्तुल आढळल्याने खळबळ उडाली आहे. इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांकडे पिस्तुल आढळली आहे. ही घटना शुक्रवारी १४ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या संशयित विद्यार्थ्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी हे पिस्तुल कुठून आले, या बाबीचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

दप्तरात आढळलं पिस्तुल

भुसावळमधील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या मुलाच्या दप्तरात पिस्तुल आढळली. हा मुलगा इयत्ता नववीत आहे. शिक्षकांनी तपासणी केल्यानंतर पिस्तुल आढळलं. विद्यार्थ्याकडे पिस्तुल आढळल्यानंतर शिक्षकांमध्ये एकच भीती पसरली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sai Tamhankar : बिनधास्त सईचा स्वॅग लय भारी, पाहा हटके PHOTOS

Maharashtra Live News Update: विना परवाना गावठी कट्टा आणि पोलिस गणवेश बाळगणाऱ्यास अटक

Vijay Melava: मी अनेक गोष्टी बोललो तर बोलायला जागा राहणार नाही; राज ठाकरेंच्या टीकेला दरेकरांचं प्रत्युत्तर

Marathi Bhasha Vijay: मनसेचा दणका! राज ठाकरे माझे हिरो आहेत – सुशील केडियाचा माफीनामा|VIDEO

Monsoon Skin Care: पावसाळ्यात चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका हवीय? 'या' घरगुती उपायांनी मिळवा चमक

SCROLL FOR NEXT