Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : गंभीर गुन्ह्याच्या शिक्षेतून सुटका होताच गांजा विक्री; महिला आरोपी फरार, तिघेजण ताब्यात

Pimpri Chinchwad News : पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तिच्या साथीदारांच्या ताब्यातून तब्बल २१ किलो गांजा आणि मोबाईलसह ११ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिटा, मोका आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांत पोलिसांनी अटक केल्यानंतर यात शिक्षा ठोठावण्यात आली होती. हि शिक्षा भोगून बाहेर आलेल्या महिलेने गांजा विक्रीला सुरवात केल्याचे उघडकीस आले आहे. गांजा विक्री करताना या महिलेच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सदर महिला हि अद्याप फरार आहे. 

कल्याणी उर्फ जयश्री उमेश देशपांडे असे गांजा विक्रीचा गोरख धंदा सुरु करणाऱ्या या महिलेचे नाव आहे. दरम्यान पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत तिच्या साथीदारांच्या ताब्यातून तब्बल २१ किलो गांजा आणि मोबाईलसह ११ लाख २७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. कल्याणी सध्या फरार असून तिचा शोध सुरू आहे. ही कारवाई पाषाण सुस रोडवरील कल्याणी कलेक्शन नावाचे दुकान आणि तिच्या घरात करण्यात आली

११ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणी देशपांडे हीने गांजा विक्री सुरू केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी छापा मारून तिघांना अटक केली. त्यामध्ये कल्याणीचा पती उमेश सुर्यकांत देशपांडे, चुलत जावई अभिषेक विकास रानवडे आणि पुतणी ऐश्वर्या अभिषेक रानवडे उर्फ ऐश्वर्या निलेश देशपांडे यांचा समावेश आहे. तर फरार असलेल्या कल्याणी हीच शोध पोलिसांकडून सुरु आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून २० किलो ७३६ ग्रॅम गांजा, तीन मोबाईल आणि रोख ७०० रुपये असा एकूण ११ लाख २७ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोण आहे कल्याणी देशपांडे?
कल्याणी देशपांडे ही सराईत गुन्हेगार आहे. यापूर्वी ती वेश्याव्यवसाय चालवण्यात सक्रीय होती. अनेक पोलिस आधिकाऱ्यांना न जुमानता तिने वेश्या व्यवसाय चालवला होता. तिच्यावर डेक्कन, कोथरूड, चतुःश्रृंगी, हवेली आदी पोलीस ठाण्यांमध्ये खून, पिटा ॲक्ट, मोका आणि फसवणूक आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर अटकेत असलेल्या अभिषेक रानवडे याच्यावरही फरासखाना, विश्रामबाग व मार्केटयार्ड पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, अपहरण, बलात्कार व अंमली पदार्थ विक्रीसारखे गुन्हे दाखल आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT