PM Awas Yojana Saam tv
महाराष्ट्र

PM Awas Yojana : पीएम आवास योजनेत घर मिळवून देण्यासाठी घेतली रक्कम; एजंटकडून कोट्यवधी रुपयांची फसवणूक

Pimpri chinchwad News : पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पीएसआरडीएने पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या परिसरात हजारो घर बांधली आहेत. या घरांची सोडत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने काढण्यात येत असते

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पंतप्रधान आवास योजनेत पीएसआरडीएने घर बांधली आहेत. या योजनेंतर्गत बांधलेल्या योजनेत घर मिळवून देण्यासाठी एजंट सक्रिय झाले आहेत. अशाच एका एजंटने पिंपरी चिंचवड शहरातील अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. घर मिळवून देण्यासाठी शेकडो नागरिकांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पीएसआरडीएने पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या परिसरात हजारो घर बांधली आहेत. या घरांची सोडत ऑनलाईन लॉटरी पद्धतीने काढण्यात येत असते. घर बांधकाम होत असतानाच याठिकाणी एजंट सक्रिय झाले आहेत. या एजंटांचे अधिकाऱ्यांशी लागेबांधे असतात. अशाच प्रकारे अधिकाऱ्यांशी संगनमत करून महिला एजंट जया ढाके हिने अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. 

शेकडो नागरिकांकडून घेतले पैसे 

पीएसआरडीएच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून तुम्हाला घर मिळवून देते असं आमिष दाखवून जया ढाके ह्या एजंट महिलेने शेकडो नागरिकांकडून रक्कम घेतली आहे. यातून कोट्यावधी रुपयाची फसवणूक केली आहे. यात कुणाकडून दोन लाख तर कुणाकडून चार लाख रुपये अशी रोख रक्कम तसेच ऑन लाईन रक्कम घेऊन जया ढाके हिने नागरिकांना लुबाडला आहे. असे करत सदर महिला एजंटने मोठे घबाड जमा केले आहे.  

महिलेविरोधात पोलिसात गुन्हा दाखल 

दरम्यान हा प्रकार काहींच्या लक्षात आला. पैसे देऊन घर मिळत नसल्याने फसवणूक झालेल्या नागरिकांनी आता पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. या नागरिकांनी जया ढाके विरोधात गुन्हा दाखल करून तिला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी फसवणूक झालेल्या नागरिकांनी केली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

IAS Officers Suspended: ठेकेदारांच्या पैशातून यूरोप-ऑस्ट्रेलियाचा दौरा; दोन IAS अधिकारी सस्पेंड, प्रशासकीय विभागात खळबळ

हातभट्ट्यांवर वरदहस्त कुणाचा? 22 जणांच्या बळीनंतर पोलीस प्रशासन अ‍ॅक्शन मोडवर, 22 अधिकाऱ्याचं निलंबन

माजी मुख्यमंत्र्यांना सरकारी बंगला रिकामा करावा लागणार; भाजप सरकारने दिला 15 दिवसांचा अल्टीमेटम

Pratap Sarnaik: अखेर पालीकरांचे स्वप्न पूर्ण! अत्याधुनिक बसस्थानक उभारणार; मंत्री प्रताप सरनाईकांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT