Pavana River Saam tv
महाराष्ट्र

Pavana River : पवना नदी पुन्हा फेसाळली, माशांचा मृत्यू; नदीत सोडले रसायनयुक्त पाणी

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र या नदीत कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असते. यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन नदी फेसाळत असते.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना नदी पात्रात मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. पवना नदी पात्रात रसायन मिश्रित पाणी तसेच मैला मिश्रित पाणी मोठ्या प्रमाणात सोडण्यात आल्याने पवना नदी पात्रातील माशांचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

पिंपरी चिंचवड शहराला पवना नदीतून पाणीपुरवठा करण्यात येत असतो. मात्र या नदीत कंपन्यांमधील रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असते. यामुळे नदीतील पाणी दूषित होऊन नदी फेसाळत असते. यापूर्वी देखील रसायन मिश्रित पाण्यामुळे पवना नदी वारंवार फेसाळली होती. त्यात पुन्हा थेरगाव येथील केजुबाई बंधारा या ठिकाणी पवना नदी पात्र मोठ्या प्रमाणात फेसाळल आहे. 

याचं ठिकाणी प्रदूषित पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात माशांचा मृत्यू झाला आहे. तसेच नदीपात्रातील इतर जलचर जीवन देखील धोक्यात आले आहे. दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या गलथान कारभारामुळे पवना नदी पात्रात काही उद्योजक रसायन मिश्रीत तसेच मैला मिश्रित पाणी वारंवार सोडत आहेत. त्यामुळे एकूणच नदीपात्रातील जलचर जीवन आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच आरोग्य देखील धोक्यात आल आहे.

रसायनयुक्त पाणी शहरात 

पिंपरी चिंचवड शहर परिसरात असलेल्या कंपन्यांमधून निघणारे घाण रसायनयुक्त पाणी हे नदीत सोडले जात असते. पवना नदीतून पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा केला जात असते. अर्थात रसायनयुक्त पाणी शहरातील नागरिकांना पिण्यासाठी जात असते. नदीतून जाणारे पाण्याचे जलशुद्धीकरण केंद्रात शुद्धीकरण करून जात असले, तरी नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT