Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : अधिकाऱ्याची गाडी दिली पेटवून; चिंचवड निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातील प्रकार

Pimpri chinchwad News : चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय आहे. त्या ठिकाणी सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीचे कामकाज सुरू आहे.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीचे रणसंग्राम सुरु आहे. निवडणुकीच्या रिंगणात उमेदवारांनी दाखल केलेल्या अर्जाची आज माघारीचा दिवस होता. यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात वर्दळ होती. दरम्यान चिंचवड विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात एका अधिकाऱ्याची चारचाकी वाहन एका दिव्यांग व्यक्तीने आग लावून पेटवून दिल्याचा प्रकार घडला आहे. 

सदरच्या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात मोठी खळबळ उडाली आहे. थेरगाव येथील पिपरी चिंचवड महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालय आहे. त्या ठिकाणी सध्या चिंचवड विधानसभा निवडणुकीचे (Vidhan Sabha Election) कामकाज सुरू आहे. याच ठिकाणी चिंचवड विधानसभेचे निवडणूक निर्णय अधिकारी यांचे देखील कार्यालय आहे. त्याच कार्यालयात अगदी काही मिनिटापूर्वी एका दिव्यांग व्यक्तीने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एका अधिकाऱ्याची चार चाकी वाहनाला आग लावून पेटवून दिला आहे. 

परिसरात खळबळ 

विधानसभा निवडणुकीची सध्या वर्दळ सुरु आहे. अर्ज माघारीचा आज अखेरचा दिवस असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात माघार घेणाऱ्यांची वर्दळ होती. याच वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ उडाली होती. सुदैवाने यात पिंपरी चिंचवड महापालिकेचे कोणतेही कर्मचारी जखमी झालं नाही आहे. वाहन पेटवून देणाऱ्या दिव्यांग व्यक्तीला पिंपरी चिंचवड शहर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

National Highway आणि Expressway मार्गांवर वाहनधारकांना मिळणार 'या' खास सुविधा; NHAI कडून प्रादेशिक कार्यालयांना निर्देश

Hair Care: केस ड्राय-फ्रिजी झालेत? मग सॉफ्ट केसांसाठी आठवड्यातून १ वेळा लावा हा घरी तयार केलेला हेअर मास्क

Perfume Hack : परफ्युमचा सुगंध उडतो? ९९% लोकांना माहितीच नाही

Satara News: शेळीला वाचवताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून आजी अन् नातवाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT