Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : मॉर्निग वॉकला येत चोरायचा दुचाकी; उच्चशिक्षित तरुणाचा कारनामा उघड, पोलिसांनी घेतले ताब्यात

Pimpri Chinchwad News : महादेव शिवाजी गरड हा चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील फक्त होंडा युनिकॉर्न कंपनीच्या दुचाकी वाहन चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या चिखली पोलिसांनी एका उच्चशिक्षित दुचाकी वाहन चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याच्या ताब्यातून जवळपास ७ लाख ३० हजार रुपये किंमतीच्या १६ दुचाकी जप्त केल्या आहेत. 

कम्प्युटर सायन्स असे शिक्षण झालेल्या महादेव शिवाजी गरड (वय २६) असं दुचाकी वाहन चोरणाऱ्या उच्चशिक्षित चोरट्याचं नाव आहे. महादेव शिवाजी गरड हा चिखली पोलीस (Police) स्टेशन हद्दीतील फक्त होंडा युनिकॉर्न कंपनीच्या दुचाकी वाहन चोरी करत असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. या दुचाकी डुप्लिकेट चाव्याच्या माध्यमातून पहाटे चार ते सात वाजता दरम्यान रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहन चोरी करत होता. (Pimpri Chinchwad) मॉर्निंग वॉक करिता लागणारी वेशभूषा धारण करून महादेव गरड हा वाहन चोरी करत असल्याने नागरिकांना त्याच्यावर संशय देखील येत नव्हता. 

मार्केट प्लेसवर कमी दरात विक्री 

दरम्यान महादेव गरड याने चोरी केलेल्या दुचाकी वाहन तो फेसबुक मार्केट प्लेसवर अजय नावाचे अकाउंट बनविले होते. या अकाऊंटवरून या दुचाकी केवळ २५ ते ३० हजार रुपयात विकून तो सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करत होता; असं पोलीस तपासच उघडकीस आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांची ₹51000 बेसिक सॅलरी होणार, आठव्या वेतन आयोगाची नवी मागणी आली समोर

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगरात सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू

पहिल्यांदा नोकरी मिळवणाऱ्यांना १५ हजारांची मदत; ७० लाख तरुणांना फायदा मिळवून देणारी 'PM-VBRY' योजना काय आहे?

Kidney Health: ही 5 मोठी लक्षणं दिसली तर समजा तुमची किडनी खराब होतेय!

फुटीर खासदारांसोबत बैठक कुठे झाली? 'ऑपरेशन टायगर'मागे कुणाची रणनीती? पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT