Pimpri Chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : चार बांगलादेशी घुसखोर नागरिकांना अटक; पिंपरी चिंचवडच्या सांगवी पोलिसांची कारवाई

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात राहण्यासाठी या बांगलादेशी घुसखोर नागरिकांनी बनावट जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशी कागदपत्र तयार केली होती

रोहिदास गाडगे

पिंपरी चिंचवड : देशात वास्तव्यासाठी लागणारी कोणतीही वैध परवानगी न घेता चार बांगलादेशी नागरिक पिंपरी चिंचवड शहरात राहत होते. याबाबत सांगवी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी चारही जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात राहण्यासाठी या बांगलादेशी घुसखोर नागरिकांनी बनावट जन्म दाखला, आधार कार्ड आणि पॅन कार्ड अशी कागदपत्र तयार केली होती. असं पोलीस तपासात उघडकीस आला आहे. पोलिसांनी सागोर सुशांतो बिस्वास, देब्रोतो वोबेन बिस्वास, जॉनी वोबेन बिस्वास आणि रोनी अनुप शिकदर असे ताब्यात घेतलेल्या चार बांगलादेशी घुसखोरांची नाव आहेत. या चारही आरोपी विरोधात सांगवी पोलीस (Police) स्टेशनमध्ये आपल्या देशात बेकायदेशीर वास्तव्यास असल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

अशी झाली उकल 

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चौघांमधील सागोर सुशांतो बिस्वास हा ३१ जुलैला पीसीसीच्या व्हेरीफिकेशनसाठी सांगवी पोलीस स्टेशनला आला होता. मात्र कागदपत्र तपासणी करताना पोलिसांना त्याचा संशय आला. यानंतर दिलेल्या कागदपत्रावर दिलेल्या पत्त्यावर तपस केला असता सागोर हा तेथे राहत नसल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत पुनावळे परिसरातून एकास व पुणे कॅम्प परिसरातून दोघांना ताब्यात घेतले. सदर तपासात हे घुसखोरी करून राहत असल्याचे समोर आले. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: MPSC मुख्य परीक्षा पुनर्तपासणीस मान्यता

MPSC students Protest: पुण्यात MPSCआंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांची नोटीस

Kidney Health : सकाळच्या या ५ सवयी ठरू शकतात किडनीसाठी घातक?

शेतकरी आणि जमीनधारकांसाठी महत्त्वाची बातमी; ७/१२ पासून ते भू-नकाशांपर्यंत सगळी माहिती एका क्लिकवर

राजकारणातील मोठी बातमी! भाजपचा मित्रपक्ष बदलणार आपल्या पार्टीचं नाव; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT