Pimpri Chinchwad News saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : घरफोडी करणारी टोळी पोलिसांच्या ताब्यात; १७ लाखाचा मुद्देमाल हस्तगत

Pimpri Chinchwad News : पुणे, पिंपरी- चिंचवड शहरात घरफोडी जबरी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात जबरी चोरी व घरफोडी करणाऱ्या टोळीच्या पिंपरी चिंचवड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तसेच या टोळीकडून पोलिसांनी सोने- चांदीच्या दागिन्यांसह पिस्तूल, काडतुसे असा साधारण १७ लाख ६२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.  

पुणे, पिंपरी- चिंचवड (Pimpri chinchwad) शहरात घरफोडी जबरी चोरी केल्याच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणी तपस सुरू असताना कुरळी या गावात सुशील उर्फ बारक्या भरत गोरे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आपल्या साथीदारासह एका घरात देशी पिस्टल सोबत लपून बसला आहे, अशी गोपनीय माहिती पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या दरोडा विरोधी पोलीस (Pimpri Chinchwad Police) पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून सुशील उर्फ बारक्या गोरे, अक्षय प्रभाकर कणसे, आणि त्याचे दोन अल्पवयीन गुन्हेगार साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

यातील चारही संशयितांवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात (Crime News) जबरी चोरी, घरफोडी मारामारी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पिंपरी पोलिसांनी दिली. त्यांच्याकडून दोन लाख दोन हजार रूपये किमतीचे चार देशी पिस्टल, चार काडतुसे, चार रिकाम्या पुंगळ्या, दहा लाख 75 हजार किमतीचे सोने - चांदीचे दागिने, चार लाख 85 हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकल असा ऐकून जवळपास 17 लाख 62 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी ३ हजार कोटींचे प्रकल्प - अमित शहा

खासदार ओमराजे निंबाळकरांना ठाकरेंचा फोन? कॉलवर नेमकं काय बोलणं झालं?

भाजपकडून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची ऑफर? ऑपरेशन टायगरनंतरच्या त्या एका ट्विटनं राजकारणात खळबळ

Gaganbawada Waterfalls : गगनबावड्याच्या हिरव्यागार दऱ्यांतील ५ निसर्गरम्य धबधबे, पाहा पावसाळ्यात खुलणारे नंदनवन!

PM Kisan 23rd installment : शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! बँक खात्यात २००० रुपये जमा, स्टेप बाय स्टेप असं करा चेक

SCROLL FOR NEXT