Pimpri chinchwad Saam tv
महाराष्ट्र

Pimpri chinchwad : ब्ल्यू व्हेल ऑनलाइन गेमच्या नादात चौदा मजली इमारतीवरून मुलाची उडी; पिंपरी चिंचवड शहरातील घटना

Pimpri Chinchwad News : मागील सहा महिन्यापासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. ब्लू व्हेल सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाला होता.

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : मुलांमध्ये ऑनलाईन गेम खेळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या ऑनलाईन गेममुळे अनेकांचे जीव गेल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. पुन्हा अशीच एक घटना पिंपरी चिंचवड शहरात घडली असून ब्ल्यू व्हेल या ऑनलाईन गेमच्या नादात एका १५ वर्षाच्या मुलाने चौदा मंजल्याच्या इमारतीवरून उडी मारली. यात मुलाचा मृत्यू झाला आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri chinchwad) शहरातील किवळे परिवारातील रुणाल गेटवे सोसायटीत २५ जुलैच्या रात्री ही दुर्देवी घटना घडली आहे. आर्य श्रीराव (वय १५) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. आर्य श्रीराव हा अत्यंत लाजाळू आणि अभ्यासू मुलागा चिंचवडमधील नामांकित स्कूलमध्ये दहाव्या वर्गात शिक्षण घेत होता. (Online Game) मात्र मागील सहा महिन्यापासून तो ऑनलाईन गेमच्या आहारी गेला होता. ब्लू व्हेल सारखा धोकादायक गेम खेळून तो प्रचंड आक्रमक झाला होता. तो तासनतास स्वतःला आपल्या घरातील खोलीत बंद ठेवून ब्ल्यू व्हेल सारखा ऑनलाईन गेम खेळत होता. कधी- कधी तर तो दोन-तीन दिवस स्वतःला खोलीत बंद ठेवत असायचा. 

अशाच प्रकारे खोली बंद करून गेम खेळताना त्याने २५ जुलैच्या रात्री त्याच्या चौदाव्या मजल्यावर असलेल्या घरातून उडी मारून आत्महत्या केली आहे. आर्य श्रीराव हा आपल्या आईसोबत किवळे येथील रूणाल गेटवे सोसायटीमध्ये राहायचा. तर त्याचे वडील विदेशात नोकरीसाठी वास्तव्यास आहेत. या घटनेमुळे श्रीराव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आर्य श्रीराव या चिमुकल्या मुलाच्या आत्महत्या प्रकरणात रावेत पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मात्र या घटनेमुळे पिंपरी चिंचवड शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT