Pimpri-Chinchwad News Saam Digital
महाराष्ट्र

Pimpri-Chinchwad Hoarding Collapsed : पिंपरी-चिंचवड शहरात कोसळलं भलं मोठं होर्डिंग; दुचाकींसह वाहनं दबल्याची भीती, पाहा Video

Pimpri-Chinchwad Rain News : मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या बाजूचं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे.

Sandeep Gawade

मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरी-चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या बाजूचं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे. सुदैवाने होर्डिंग रस्त्यावर कोसळलं नाही त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. होर्डिंगखाली चार दुचाकी आणि टेम्पो दबल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. दुपारी साडेचार च्या सुमारास शहरातील काही अवकाळी पावसान जोरदार हजेरी लावली. यावेळी वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. त्यामुळे जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भलं मोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील मोश परिसरामध्ये आजी होर्डिंग कोसळून दुर्घटना घडली. ती होर्डिंग अधिकृत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाशचिन्ह परवाना विभागाने दिली आहे. मात्र ज्या ठिकाणी ही होर्डिंग उभारण्यात आली होती. ती जागाच रेड झोन आरक्षित असल्याने पिंपरी चिंचवड महापालिकेने सदर जागे वर होर्डींग उभारण्यासाठी परवानगी कशी दिली असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागाने सदर होर्डिंगचं योग्य स्ट्रक्चरल ऑडिट न कल्याने ही होर्डिंग कोसळली आहे. कोसळलेली होर्डिंग ही आनंद गांधी यांच्या मालकीची असून होर्डिंग मालकावर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात येईल अशी माहिती आकाश चिन्ह परवाना विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली आहे.

दरम्यान वादळी वाऱ्यामुळे पिंपरी चिंचवड शहरात सहा ठिकाणी झाडं उन्मळुन पडली आहेत. पांजोर पोळ, बोराडे वाडी मोशी, मोरवाडी, सुदर्शन नगर, थेरगाव आणि प्राधिकरण या भागात झाडं कोसळली आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन दल झाड हटविण्यासाठी घटनास्थळी रवाना झालं आहे. झाडं पडल्यामुळे काही ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल; २४k, २२k, १८k सोन्याची प्रति तोळा किती किंमत? वाचा ताजे दर

IPL 2026: 1...2...3 नाही तर तब्बल 11 चेंडू; अर्शदीप सिंगने हद्दच केली, फेकली सर्वात मोठी ओव्हर

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT