FDA News Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad : विनापरवानगी खाद्यपदार्थ विकल्यास २ लाखाचा दंड; विक्रीसाठी लायसन्स आवश्यक

Pimpri Chinchwad news : रस्त्यावर लागलेल्या स्टॉलवर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याने काहींना त्रास जाणवतो. यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे देखील यावर लक्ष असते. या अनुषंगाने नवीन नियम लागू करण्यात येत आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : रस्त्यावर किंवा उपहारगृहात विविध खाद्यपदार्थ विक्रीसाठी उपलब्ध असतात. काही ठिकाणी स्पेशल पदार्थ केला जाऊन त्याची विक्री केली जात असते. मात्र आता कोणतेही खाद्यपदार्थ विकायचे असल्यास त्याची परवानगी आवश्यक असणार आहे. विना परवानगी विकल्यास जवळपास दोन लाख रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

शहरांमध्ये रस्त्यावर खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल लावण्यात येत असतात. याशिवाय उपहारगृहात देखील स्पेशल डिश उपलब्ध असते. याठिकाणी जाऊन खवय्ये देखील आवडीने खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत असल्याचे पाहण्यास मिळते. बऱ्याचदा रस्त्यावर लागलेल्या स्टॉलवर उघड्यावरील खाद्यपदार्थ खाण्याने काहींना त्रास जाणवत असतो. यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे देखील यावर लक्ष असते. याच अनुषंगाने नवीन नियम लागू करण्यात येत आहे.  

पुण्यात २६ हजार व्यावसायिकांकडे लायसन्स 
रस्त्यावर किंवा उपहारगृहात खाद्यपदार्थ विकण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासन विभागाचा फूड लायसन्स परवाना घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. आतापर्यंत एकट्या पुणे जिल्ह्यात जवळपास २५ हजार ९६० अन्न व्यवसायिकांनी फूड लायसन्स परवाना घेतला आहे. तर १ लाख २७ हजार ७८ व्यावसायिकांनी अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आपली नोंदणी केली आहे. अर्थात जो काही खाद्य पदार्थ विक्री करायचा आहे. त्याची परवानगी आवश्यक झाली आहे. 

तर दोन लाखाचा दंड होणार वसूल 

फूड लायसन्स काढण्याचा खर्च हा अत्यंत कमी असल्याने रस्त्यावर अन्न पदार्थ विकणाऱ्यांनी फूड लायसन्स परवाना घेणे अनिवार्य आहे; असं अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केले आहे. फूड लायसन्स शिवाय खाद्यपदार्थांची विक्री केल्यास अन्न व सुरक्षा मानद कायद्या अंतर्गत जवळपास दोन लाख रुपये इतका आर्थिक दंड वसूल करण्याची तरतूद आहे; असं अन्न व औषध प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT