Pimpri Chinchwad Crime Saam tv
महाराष्ट्र

Pimpri Chinchwad Crime : किरकोळ वादातून भयानक कृत्य; छातीवर स्क्रू ड्रायव्हरने वार, रिक्षा चालकाचा मृत्यू

Pimpri Chinchwad : स्क्रू ड्रायव्हरने छातीवर वार केल्यामुळे ऑटो रिक्षा चालकाच्या हृदयावर गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड जकात नाका परिसरात रात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून एका जणाने छातीवर स्क्रू ड्रायव्हरने जोरदार वार केला. यात रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात ऑटो रिक्षा चालकाच्या खुनाच्या धक्कादायक घटनेचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आला आहे. यात रिक्षा चालक व एका व्यक्तीमध्ये वाद सुरु होता. त्यांचा वाद मिटविण्यासाठी अन्य एकजण प्रयत्न करत होता. याच वादात एक व्यक्ती ऑटो रिक्षा चालकावर स्क्रू ड्रायव्हरने वार करताना (Crime News) दिसत आहे. स्क्रू ड्रायव्हरने छातीवर वार केल्यामुळे ऑटो रिक्षा चालकाच्या हृदयावर गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. 

आरोपीचा शोध सुरु 

किरकोळ वादातून एका व्यक्तीने ऑटो रिक्षा चालकावर स्क्रू ड्रायव्हरने वार करत त्याचा खून केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून रिक्षा चालकाला मारल्यानंतर आरोपी हा घटनास्थळावरून पसार झाला आहे. दरम्यान या प्रकरणात चिंचवड पोलिस ऑटो रिक्षा चालकावर वार करणाऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

मराठवाड्यात 3 जणांचं कुणबी प्रमाणपत्र अवैध; मनोज जरांगे फडणवीस सरकारवर संतापले|VIDEO

Kalyan : सख्ख्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला थेट जन्मठेपेची शिक्षा, कल्याण कोर्टाचा ऐतिहासिक निकाल

Supreme Court: CJP वर कारवाई करा; याचिकेवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी, वाचा नेमकं प्रकरण काय?

गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

SCROLL FOR NEXT