Pimpri Chinchwad News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : घरफोडीसाठी भयानक प्लॅन; पोलिसही चक्रावले, नेपाळी टोळी ताब्यात

Pimpri Chinchwad News : पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून हि टोळी सक्रिय झाली होती. घरकामासाठी बाईची आवश्यकता असलेल्या घराची टेहळणी करत घरकामासाठी मोलकरीण म्हणून कामाला लागायचे

गोपाळ मोटघरे

पिंपरी चिंचवड : घरफोडी करणारी टोळी सक्रिय होत रात्रीच्या सुमारास घरात घुसून चोरी केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये भर दिवसा प्लॅन आखून चोरी केली जात असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. घरातील मंडळींना गुंगीचे औषध देऊन लोकांच्या घरात चोरी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय नेपाळी टोळीला पिंपरी चिंचवड शहरातील निगडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून हि टोळी सक्रिय झाली होती. घरकामासाठी बाईची आवश्यकता असलेल्या घराची टेहळणी या टोळीकडून केली जात होती. यानंतर तेथे जाऊन घरकामासाठी मोलकरीण म्हणून कामाला लागायचे. अर्थात एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या घरात जाऊन त्यांचा विश्वास संपादन करून घर कामासाठी कामाला लागायचे. या दरम्यान आपल्या साथीदारांसोबत चोरीचा प्लॅन आखला जायचा. 

गुंगीचे औषध देऊन करायचे चोरी 

घरात काम करायला काही दिवस झाल्यानंतर घरातील मंडळींना जेवणातून किंवा एखाद्या पेयातून गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्याचे काम केले जात होते. यानंतर आपल्या साथीदाराच्या मदतीने चोरी करण्याची पद्धत या टोळीने अवलंबली होती. घरफोडीचा गुन्हा केल्यानंतर ही टोळी नेपाळला विमानाने पसार होत होती. त्यानंतर पुन्हा काही महिन्यांनी आपल्या देशात येऊन पुन्हा घरफोडी करत होते.

तिघेजण पोलिसांच्या ताब्यात 

पोलीस तपासात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे. यानंतर पोलिसांनी टोळीतील कमल बहादूर नारायण शाही, नवीन बहाद्दूर रुद्र बहादूर शाही (वय २४) आणि नर-बहादुर दिप बहादुर शाही (वय ३८) या तिन जणांना निगडी पोलिसांनी बेंगलोर विमानतळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी मिळून त्यांच्या साथीदारच्या मदतीने कर्नाटक, केरळ आणि महाराष्ट्रात चार घरफोडी केल्याचे गुन्हे निगडी पोलिसांनी उघडकीस आणले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fig Water for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी बदाम-अक्रोडऐवजी सकाळी प्या अंजीरचं पाणी; शरीराला होतील भरपूर फायदे

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT