Nagpur Crime News, Police, Bhivapur saam tv
महाराष्ट्र

Nagpur Crime News : भरदिवसा पेट्राेल पंप मालकाला संपवलं, दाेन लाखांची लूट; नागपूरात तिघांचा शाेध सुरु

पोलीसांनी संशयितांचा शाेध सुरु केला आहे.

संजय डाफ

Nagpur News : नागपूर जिल्ह्यात एका पेट्रोल पंप व्यावसायिकाची भरदिवसा हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर हल्लेखाेरांनी पेट्राेल पंपावरुन सुमारे दाेन लाख रुपयांची लूट करुन पाेबारा केली आहे. घटनास्थळावर स्थानिक नागरिकांची माेठी गर्दी जमली आहे (Maharashtra News)

ही घटना नागपूर जिल्ह्यातील भिवापूर (bhivapur) तालुक्यात आज (बुधवार) दुपारच्या सुमारास घडली. तिघांनी धारदार शस्त्रांनी पेट्रोल पंप मालक दिलीप सोनटक्के (dilip sontakke) यांची हत्या केली.

साेनटक्के यांच्यावर अचानक झालेल्या हल्ल्यामुळे पेट्राेल पंपावर एकच गाेंधळ उडाला. या हल्लेखोरांकडे बंदुका देखील हाेत्या अशी माहिती घटनास्थळावरुन मिळाली. या हत्येनंतर पेट्रोल पंपाच्या तिजोरीतील दोन लाख रुपये घेऊन तिघा जणांना पळ काढला आहे.

या घटनेनंतर पेट्राेल पंपावर नागरिकांची माेठी गर्दी जमा झाली. ही हत्या अनैतिक संबंध, प्रॉपर्टी आणि लुटपाटच्या उद्देशाने केल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस घटनास्थळी पाेहचले असून भिवापूर तालुक्यासह नागपूरात संशयित आरोपींचा शोध सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात भीषण अपघात; टँकरच्या धडकेत भाजी विक्रेत्या महिलेचा मृत्यू, मुलगा जखमी

Maharashtra Politics : फडणवीस-शिंदे असते तर गुंगा गुड्डा म्हटले असते, राऊतांच्या वक्तव्याने वाद उफळणार?

Morning Exercise: सकाळी उठताच फक्त ५ मिनिटे करा 'हे' व्यायाम; दिवसभर राहाल उत्साही आणि फ्रेश

Eknath Shinde : सिद्धिविनायक मंदिर देणगी घोटाळा प्रकरणात एकनाथ शिंदेंचे तातडीचे आदेश, ठाकरे सेना अडचणीत येणार?

Rohit Sharma: रोहित शर्मा स्वतःहून निवृत्ती घेणार नाही; मोहम्मद कैफच्या वक्तव्याने रंगली नवी चर्चा

SCROLL FOR NEXT