Petrol Diesel Latest Price, Fuel Price updates Saam TV
महाराष्ट्र

Petrol Diesel: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त की महाग? जाणून घ्या आजचा भाव

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत जनतेसाठी मोठी घोषणा केली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : मागील काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या (Crud Oil) किंमतीत चढ-उतार होताना दिसत आहे. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांवर पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) दर वाढवण्यास दबाव येत आहे. गेल्या 24 तासांत पुन्हा कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाली. ब्रेंट क्रूडची किंमत आज म्हणजेच सोमवारी सकाळी सुमारे 114 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली. (Petrol Diesel Latest Price Today)

सोमवारी ही किंमत प्रतिबॅरेल 111 डॉलर इतकी होती. जी सोमवारी सकाळी 111 डॉलर होती. कच्च्या तेलाची किंमत वाढताच मंगळवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर जाहीर केले आहे. दरम्यान, भारतात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. दिल्लीत अजूनही पेट्रोल 96.72 रुपये प्रतिलिटर मिळत आहे. 6 एप्रिलपासून कंपन्यांनी त्याच्या किमती वाढवल्या नाहीत.

विशेष बाब म्हणजे एकावेळी कच्च्या तेलाच्या किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर गेल्या होत्या. मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 113.8 डॉलर होती, जी गेल्या आठवड्यात प्रति बॅरल 119 डॉलरवर पोहोचली होती.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होणार?

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधानसभेत जनतेसाठी मोठी घोषणा केली. पेट्रोल-डिझेलवरील वाढते दर कमी करण्यासाठी त्यांचा प्रयत्न असून पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती उतरण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मंगळवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये इतका आहे. तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 109.27 रुपये असून, डिझेलचा दर प्रति लिटर 95.84 रुपये एवढा आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : ऑपरेशन लोटसमुळे पुण्यात भूकंप अन् विरोधकांना हादरे, पूर्व अन् पश्चिमेत भाजपकडून करेक्ट कार्यक्रम

Pune-Nagpur Vande Bharat Train: पुणे - नागपूर वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये मोठा बदल, रेल्वेने नेमका काय घेतला निर्णय?

Makeup Remover: केमिकल प्रोडक्टने मेकअप काढण्यापेक्षा 'या' घरगुती सामग्रीने काढा मेकअप, चेहऱ्याला नाही होणार त्रास

Liver Detox: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी लिव्हर होईल स्वच्छ, फॅट आणि घाण होईल झटक्यात दूर

Long Hair Tips: लांब आणि सरळ केसांसाठी करा 'हे' ३ सोपे घरगुती उपाय; पार्लरचा हजारो रूपयांचा खर्च वाचेल

SCROLL FOR NEXT