Petrol Diesel News, Saam TV
महाराष्ट्र

कच्चा तेलाच्या किंमतीत मोठी घसरण; पेट्रोल डिझेल आणखी स्वस्त? पाहा आजचे दर

इंधनाचे दर हे कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमतीवर आधारित असतात.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून इंधन दरवाढीमुळे नागरिक त्रस्त आहेत. पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किंमती गगनाला भिडल्याने पेट्रोल पंपावर (Petrol Pump) इंधन भरताना अनेकांचा खिसा रिकामा होतो. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर आणखी कमी व्हावेत अशी अनेकांची इच्छा आहे. इंधनाचे दर हे कच्चा तेलाच्या (Crud Oil) किंमतीवर आधारित असतात. दरम्यान, आज कच्चा तेलाच्या किंमतीत प्रतिबॅरेल 10 डॉलरची घट झाली. मात्र, असं असलं तरी पेट्रोल-डिझेलच्या दरात कुठलाही बदल झालेला नाही. (Petrol Diesel Latest Price Today)

गेल्या काही दिवसांपासून विशेषत: रशिया-युक्रेन युद्धामुळे आंतराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. त्यामुळे इंधन दरवाढीचा दबाव तेल कंपन्यांवर आला होता. आता ओपेकने कच्चा तेलाचा वापर कमी केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे कच्चा तेलाचे दर प्रतिबॅरेल 10 डॉलर्सनी घसरले आहे. आज सकाळी कच्चा तेलाचे दर 114 डॉलर इतके होते.

दरम्यान, इंधनाच्या किंमती गगनाला भिडल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त होता. त्यामुळे केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी पेट्रोल डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल 9.50 रुपयांनी तर डिझेल 7.50 रुपयांनी स्वस्त झाले होते. केंद्रापाठोपाठ राज्यानेही पेट्रोलवरील टॅक्स कमी केल्याने वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला होता. आता कच्च्या तेलात मोठी घसरण झाल्याने इंधनाचे दर आणखी कमी होईल अशी आशा सर्वसामान्यांना आहे.

4 प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर

मुंबई - मुंबईत पेट्रोल 109.27 रुपये आणि डिझेल प्रतिलिटर 95.84 रुपयांनी विकलं जातंय.

दिल्ली - दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 96.72 आणि डिझेलचा दर 89.62 इतका आहे.

चेन्नई - चेन्नईत पेट्रोल 102.63 रुपये प्रतिलिटर आणि डिझेल 94.24 रुपये प्रतिलिटर इतक्या दराने विकलं जातंय.

कोलकाता - कोलकत्यामध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये आणि डिझेल दर प्रतिलिटर 92.76 रुपये इतका आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: धाराशिवात १७ मुलींना झाली विषबाधा

The Hunt: माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येवर आधारित 'द हंट' ही मालिका तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

SCROLL FOR NEXT