FUEL PRICE HIKE IN INDIA  Saam Tv
महाराष्ट्र

10 दिवसांत पेट्रोल-डिझेलचा तिसऱ्यांदा भडका; आधीच इंधनटंचाई, त्यात दरवाढीचे चटके, VIDEO

petrol diesel price hike : राज्यात अनेक ठिकाणी इंधन तुटवड्याचं संकट असताना तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे. गेल्या 10 दिवसांत तिसऱ्यांदा पेट्रोल-डिझेलची दरवाढ झालीय. त्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी गत सामान्यांची झालीय. कुठे किती दर वाढलाय ?आणि त्याचा कशावर परिणाम होणार ?पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Saam Tv

रोहित कदम, साम टीव्ही

राज्यातल्या पेट्रोल पंपांवर सध्या अभूतपूर्व अशी आणीबाणी पाहायला मिळतेय. राज्यातल्या विविध जिल्ह्यांत इंधन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक चांगलाच हैराण झालाय. अशातच आता तेल कंपन्यांनी गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग तिसऱ्यांदा वाढ केलीये. राज्यात पेट्रोल 90 पैशांनी तर डिझेल 94 पैशांनी महागलंय. राज्यातील विविध शहरांत पेट्रोलच्या दरानं 110चा आकडा गाठलाय तर डिझेलची शंभरीकडे वाटचाल सुरू झालीये. गेल्या 10 दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरात कशी वाढ झालीये पाहूयात...

15 मेला पेट्रोल दरात 3 रुपयांची वाढ केल्यानं पेट्रोलचे भाव 106.50 रुपयांवर पोहोचले. तर 19 मेला पेट्रोलमध्ये 91 पैशांनी वाढ झाल्यानं पेट्रोलचे दर 107.59 रुपयांवर पोहोचले. तर 23 मेला पेट्रोल 90 पैशांनी महागल्यानं पेट्रोलचे दर 108.49 रुपयांवर पोहोचले.

तर दुसरीकडे, 15 मेला डिझेल दरात 3 रुपये 11 पैशांची वाढ केल्यानं डिझेलचे भाव 93.14 रुपयांवर पोहोचले. तर 19 मेला पेट्रोलमध्ये 94 पैशांनी वाढ झाल्यानं डिझेलचे दर 94.08 रुपयांवर पोहोचले. तर 23 मेला डिझेल 94 पैशांनी महागल्यानं डिझेलचे दर 95.02 रुपयांवर पोहोचले.

इंधन दरवाढीमुळे राज्यातील उद्योग-व्यवसायांवरही मोठं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. उद्योग-व्यवसायांच्या पुरवठा साखळीवर कसा परीणाम होऊ शकतो यावर एक नजर टाकूयात.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत 108 डॉलरपर्यंत पोहोचलीये. येत्या काही दिवसांत इंधन दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीचा सर्वाधिक फटका कृषी, अन्नधान्य, एफएमसीजी, पोलाद, ई-कॉमर्स आणि पर्यटन क्षेत्रांना बसण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे, वाढत्या इंधन आणि वाहतूक खर्चामुळे कंपन्यांच्या दैनंदिन खर्चात वाढ होण्याची भीती आहे. तसंच, पारंपरिक ऑटो, टॅक्सी आणि इतर वाहनांचे भाडेदेखील वाढू शकते.

विशेष म्हणजे, एप्रिल 2026 मध्ये घाऊक महागाई दराने मागील 42 महिन्यांचा उच्चांक गाठलाय. तो थेट 8.30 टक्क्यांवर पोहोचलाय. अशातच आता वाढत्या इंधन दरवाढीमुळे उद्योग-व्यवसायांवर नवं संकट निर्माण झालंय. मालवाहतुकीसाठी ट्रकचा तुटवडा आणि उत्पादन खर्च वाढल्यामुळे कंपन्यांसमोर संकट निर्माण झालंय. दुसरीकडे सर्वसामान्य जनताही महागाईच्या कचाट्यात सापडलीये. एकूणच इंधन दरवाढीमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेसमोरही संकट निर्माण झालंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

Wardha: ग्रामसभेत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी, गावकऱ्यांनी एकमेकांना धूधू धुतलं; व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Update: ओबीसी बांधव जात पडताळणी कार्यालयात; बोगस कुणबी प्रमाणपत्र देऊ नका

जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

Housing Society Rules: हाउसिंग सोसायटीत नियम मोडला तर दंड कोणाला लागतो? घरमालक की भाडेकरू?

SCROLL FOR NEXT