petition filed against jaykumar gore in high court about corruption in corona death cases Saam Digital
महाराष्ट्र

200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोटय़वधी रुपये लाटल्याचा जयकुमार गोरेंवर गंभीर आराेप, 5 जूलैला सुनावणी

petition filed against jaykumar gore in high court about corruption in corona death cases : या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून देशमुख यांनी केली आहे.

ओंकार कदम

मायणी येथील इन्स्टिट्यूट ऑफ द मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर या रुग्णालयातील कोरोना काळातील कोट्यावधीचा भ्रष्टाचाराचा आराेप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर लावण्यात आला आहे. त्याबाबतची सुनावणी 5 जुलैला उच्च न्यायालयात हाेणार आहे.

आमदार जयकुमार गोरे यांच्यावर कोरोना काळात 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मायणी येथील दीपक आप्पासाहेब देशमुख यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या प्रकरणात आमदार जयकुमार गोरे यांच्यासह त्यांच्या पत्नी सोनिया गोरे आणि इतर संशयित आरोपींविरुद्ध तातडीने गुन्हे दाखल करून सखोल चौकशी करावी अशी मागणी याचिकेतून देशमुख यांनी केली आहे. त्याबाबतची सुनावणी येत्या 5 जूलैला उच्च न्यायालयात हाेणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणजवळ शिक्षण संस्थेचा अनुदान घोटाळा? २ एकरऐवजी ७.५ एकर जमीन दाखवून कोट्यवधींची फसवणूक

Arshdeep Singh: अर्शदीपला 'ती' चूक पडली महागात, चांगली कामगिरी करूनही ICC कडून मोठी कारवाई

Maharashtra Live News Update : मुंबईच्या गोरेगावात १३ अनधिकृत दुकानांवर पालिकेची कारवाई

AhilyaNagar News: आई-बहिणीवरून शिवी द्याल तर बसेल दंड; कोळगावच्या निर्णयाची राज्यभरात चर्चा

तब्येत बिघडली, मंचावरून खाली पडले; रुग्णालयात उपचाराअभावी भाजपच्या महामंत्र्याचे निधन, राजकीय वर्तुळात हळहळ

SCROLL FOR NEXT