Dog Chased Leopard Saam Tv
महाराष्ट्र

Dog Chased Leopard: मालकासाठी पाळीव कुत्र्यानं घेतला बिबट्याशी पंगा! वाचवले संपूर्ण कुटुंबाचे प्राण, पंचक्रोशीत चर्चा

Dog Save Family From Leopard: अनेकदा आपण बिबट्याच्या हल्ल्यात कुत्र्याचा बळी गेला, अशा घटना पाहिल्या आहेत. पण आता एका कुत्र्यानेच बिबट्याला पळवून लावल्याची घटना मुळशीमधून समोर येत आहे. त्याने स्वतःसह वाचवले घरातील व्यक्तींचे प्राण वाचवले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Dog Chased Leopard In Mulshi

आतापर्यंत नेहमीच बिबट्याने शिकार करून अनेक जनावरं फस्त केल्याचं पहायला मिळतं. पण मुळशीमध्ये एका कुत्र्यानेच बिबट्याची पळता भुई थोडी केली आहे. कुत्र्याच्या या धाडसीपणाची चर्चा संपूर्ण पंचकृषीमध्ये गाजत आहे. (Maharashtra News)

मुळशीमधील कासारसाईमधील ही घटना आहे. घड्याळात बरोबर रात्रीचे सव्वा बारा वाजले होते. सर्वत्र गडद अंधार (Dog Chased Leopard) होता. रात्रीच्या काळोखात रातकिडे किर्रर्र करत होते. सर्वत्र शांतता होती. अशा स्थितीत एका बिबट्याने हलक्याच पावलानं एका घराच्या अंगणात प्रवेश केला. पुढे काय घडलं हे ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कासारसाई येथील रहिवासी शांताराम लेणे यांच्या घरात बिबट्या आला. बिबट्या शिकार करण्याच्या हेतुनं त्यांच्या अंगणात आला होता. आपल्यासोबत काय होणार आहे, याची पुसटशीही कल्पना त्या बिबट्याला नसेल. अंगणामध्ये लेणे यांचा पाळीव कुत्रा बसलेला होता.

लेणे यांच्या कुत्र्याने (Dog) बिबट्याला पाहिलं, अन त्याचा धिटाईने सामना केला. लेणे यांच्या कुत्र्याने बिबट्याला (leopard) हुसकावून लावलं. पाळीव कुत्र्याने प्रथमच बिबट्याला हुसकावून लावल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे.

लेणे यांच्या पाळीव कुत्र्याने बिबट्याला हुसकावून लावल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या पाळीव कुत्र्याने स्वतःसह घरातील व्यक्तींचे प्राण (Dog Save Family From Leopard) वाचवले आहेत. त्यामुळे गावागावात आता या कुत्र्यांची चर्चा रंगू लागली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT