vitthal rukmini mandir pandharpur 
महाराष्ट्र

वारकरी संप्रदायात आनंद; पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार

कार्तिकी यात्रेची प्रशासनाने व विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने तयारी सुरू केली आहे

भारत नागणे

पंढरपुर : कोरोनाच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करत कार्तिकी kartiki ekadashi यात्रा भरवण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल दोन‌ वर्षानंतर १५ नोव्हेंबरला पंढरपुरात कार्तिकी यात्रा भरणार आहे. या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शासकीय महापूजा हाेईल असे सांगण्यात आले. permission-granted-to-celebrate--in-vitthal-rukmini-temple-pandharpur-ajit-pawar-sml80

काेविड १९ च्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्ष पंढरपुरात कोणतीही यात्रा भरून शकलेली नाही. त्यामुळे भाविकांसह पंढरपुरातील व्यापारी वर्ग नाराज हाेता. गत काही महिन्यांपासून कोविड १९ ची रुग्ण संख्या कमी झाल्याने शासनाने येथे लावण्यात आलेले अनेक निर्बंध कमी केले आहेत. कार्तिकी यात्रेस शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी वारकरी संप्रदाय आणि व्यापारी करीत हाेते. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने देखील कार्तिक यात्रा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली होती.

दरम्यान प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी काेविड १९ च्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करत यात्रा भरण्यास परवानगी मिळावी असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. त्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी हिरवा कंदील दाखविला आहे. शंभरकर यांनी यात्रा काळात काेणत्या प्रकारची दक्षता घेण्यास हवी याबाबतच्या सूचनांसह कार्तिक यात्रेचा आदेश काढला.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Tourism : शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा 'हा' गड 'सापांचा किल्ला' म्हणून प्रसिद्ध

Maharashtra News Live Update: नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर

Mumbai Drug Party: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीला अटक; बँक खात्यातून 7 महिन्यात 50 लाखांची उलाढाल, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Maharashtra Heatwave : महाराष्ट्रात उष्णतेची लाट! तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसवर; घराबाहेर पडण्याआधी वाचा हवामानाचा इशारा

Government Decision: खुशखबर! सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात लवकरच होणार वाढ; सरकारने दिले निर्देश

SCROLL FOR NEXT