Gautami Patil Saam Tv
महाराष्ट्र

Gautami Patil : गौतमी पाटीलचा डान्स पाहण्यासाठी लोक वेडे; कुणी चक्क झाडावर चढले तर कुणी...

आज संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील हे नाव चर्चेत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

कैलास चौधरी

उस्मानाबाद - गौतमी पाटील हे नाव सोशल मीडियावर (Social Media) वाऱ्याच्या वेगाने पसरलं आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात गौतमी पाटील (Gautami Patil) हे नाव चर्चेत आहे. लावणीच्या नावावर अश्लील हातवारे व हावभाव करण्यावरून गौतमीवर अनेक स्थरातून जोरदार टीका होत आहे. गौतमीच्या अश्लील डान्सची क्लिप सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली होती. दरम्यान आता गौतमीच्या नव्या कार्यक्रमाचे व्हिडिओ समोर आले आहेत. या कार्यक्रमासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केलं असल्याचं पाहायला मिळतं.

गौतमी पाटीलच्या अदाकारीने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावल आहे. तुळजापूर तालुक्यातील देव वडगाव येथील एका कार्यक्रमात गौतमीचा डान्स पाहण्यासाठी इतकी गर्दी झाली होती, की अनेकांनी चक्क झाडावर चढत गौतमी पाटील हिचा कार्यक्रम पाहिला. या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वडगाव येथे खंडोबा यात्रेनिमित्त गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गर्दी इतकी प्रचंड होती की कार्यक्रम संपल्यानंतर देखील तरुणाई तिथेच थांबून होते. आयोजकांकडून वारंवार सूचना करून देखील प्रेक्षक कार्यक्रम स्थळावरून जायला तयार नव्हता. त्यानंतर पोलिसांच्या गाडीत गौतमी पाटीलला कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडावे लागले.

कोण आहे गौतमी पाटील?

गौतमी पाटील ही मुळची धुळ्याची आहे. सिंधखेडा या गावात तिचा जन्म झाला. तिथेच ती लहानाची मोठी झाली. गौतमीचा जन्म झाला तसं तिच्या वडिलांनी तिला आणि तिच्या आईला सोडले. त्यानंतर आईच्या वडिलांनी गौतमीचे संगोपन केले. आठवी शिक्षण सोडून ती पुण्यात राहायला आली. गौतमीची आई नोकरी करायची. पण तिचा अपघात झाल्यानंतर गौतमीवर घरची जबाबदारी आली. गौतमीला लहानपणापासून नृत्याची आवड होती. तिने क्लासही लावला होता. दरम्यान अकलूज लावणी महोत्सवात तिने पहिल्यांदा लावणी केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

तुकाराम मुंढे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT