Ahmednagar Crime News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar Crime News: अहमदनगरच्या शेवगाव हिंसाचार प्रकरणात मोठी अपडेट; नागरिकांनी व्यक्त केला मोठा संशय

Ahmednagar Crime News: या हिंसाचाराबाबात नागरिकांनी मोठा संशय व्यक्त केला आहे.

सम टीव्ही

सुशील थोरात

Ahmednagar News: अहमदनगरमधील शेवगाव येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त निघालेल्या मिरवणुकीवर रविवारी रात्री दगडफेक झाल्याची घटना घडली. ही घटना घडल्यानंतर शहरांमध्ये दोन गटांमध्ये तुफान दगडफेक झाली. या दगडफेकीदरम्यान हिंसक जमावाने रस्त्यावरील दुचाकी चार चाकी वाहनांची नुकसान झाले. या हिंसाचाराबाबात नागरिकांनी मोठा संशय व्यक्त केला आहे. (Latest Marathi News)

अहमदनगरमधील शेवगावमध्ये सध्या दगडफेकीनंतर एक बाब समोर आली आहे की, एवढ्या मोठ्या प्रमाणात हे दगड नेमके कोणी आणि कुठे आणून ठेवले होते हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे. काही लोकांच्या माहितीनुसार अनेक बाहेरगावचे तरुण मुलं या दगडफेकीमध्ये सामील असल्याचं पोलिसांना आणि येथील नागरिकांना संशय आहे.

काही तरुण तोंडाला रुमाल बांधून हातात दगड आणि काठ्या घेऊन तरुण तोडफोड करताना दिसून आले. त्यामुळे ही दंगल पूर्वनियोजित होती का? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण दगडफेकी साठी अचानकपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठमोठे दगड शहरामध्ये आले कुठून याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलीस याबाबत आता सखोल तपास करीत आहेत.

अकोला या ठिकाणी ही हिंसा झाली, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दगडफेक झाली होती. त्यामुळे शहराच्या गल्लीबोळात दगड कुठून येतात की आणली जातात, याबाबत पोलीस तपास होणे गरजेचे आहे.

दरम्यान, अलीकडच्या काळात अहमदनगर शहरातही काही ठिकाणी दगडफेक झाली होती, त्या ठिकाणीही अचानकपणे मोठ-मोठे दगड फेकण्यात आले होते. त्यामुळे दगड नेमकं खोल जमा करतात किंवा जमा करायला लावते हेही तपासणी गरजेचे असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.

तरुण संशयित आहेत त्यांना कोंबिंग ऑपरेशन करून पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस सुरू केली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी 60 ते 70 जणांना ताब्यात घेऊन चौकशी केली आहे. तर या हिंसाचार प्रकरणी अडीचशे जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जरांगेंची मंत्री विखे पाटलांकडे खळबळजनक मागणी, परळीवाल्या आता...; काय घडलं? VIDEO

Maharashtra News Live Update: रानडुकरांच्या हैदोसामुळे शेतकऱ्याचे उभे केळीचे पीक जमीन दोस्त

डायबिटीजमध्ये किवी खावा की नाही? रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी 'हे' फळ ठरेल फायदेशीर

RCB vs GT IPL 2026 Final: कोण जिंकणार आयपीएल २०२६चा कप? RCB आणि GT मधील महसंग्राम कुठे, केव्हा आणि कसा पहाल?

Maharashtra Farmer Loan : १० दिवसांमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, राज्य सरकारची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT