बारामती इंक्युबेशन इनोव्हेशन सेंटर SaamTV
महाराष्ट्र

Baramati : पवार साहेब महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहेत - उद्धव ठाकरे

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामती इंक्युबेशन इनोव्हेशन सेंटर चे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अश्विनी जाधव केदारे साम टीव्ही पुणे

बारामती : आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत. बारामती इंक्युबेशन इनोव्हेशन सेंटरच्या उद्घाटन (Baramati Incubation Innovation Center) प्रसंगी ते बोलत होते पवारांसारखा तरणाबांड नेता ज्यांनी विकासाचा सूर्य दाखवला, जे अजूनही थांबायला तयार नाही पवार साहेब महाराष्ट्र चं नेतृत्व करत असल्याचे गौरोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

हे देखील पहा -

मुख्यमंत्री म्हणाले ' मला यायला अडचण होती, काय अडचण होती तेही सांगून ठेवतो माझे पाय धरले होते. कोणी पाय धरावेत इतका मी काही मोठा नाही, उभा राहिलो तरी कधीच डगमगत नाही, तसेच संस्था ही तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवते. पंखाना भरारी देण्याच काम या संस्था करतात. जिद्द पाहिजे, बदल घडू शकतो. राजकारणामध्ये देखील राजकारणात ही इंक्युबेशन सेंटर असावं, आम्ही 25 ते 30 वर्षांपूर्वी इंक्युबेशन केलं आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली असा टोला त्यांनी भाजपला लगावला. तसेचआम्ही आमच कर्तव्य केलं असल्याचेही ते म्हणाले.

पवार साहेबांनी दगडाला पाझर फोडला -

तसेच आजचा हा क्षण माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. देशातील मोठ्या सेंटरवरती माझ नावं आहे. तसेच या कामात माझा काही हातभार नाही फक्त बटन दाबण्यापुरता माझा हातभार असल्याचही ठाकरे म्हणाले.तसेच पवार साहेबांनी दगडाला देखील पाझर फोडून दाखवला असही ते यावेळी म्हणाले. दरम्यान या कार्यक्रमास रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे, सकाळ माध्यम समूहाचे प्रतापराव पवार कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थित होते.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT