pawanraje urban nidhi patsanstha president prahlad sawant passed away in beed saam tv
महाराष्ट्र

Beed : पवनराजे अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत यांनी जीवन संपवलं

विनोद जिरे

Beed News :

बीड जिल्ह्यातील परळी येथे असलेल्या पवनराजे अर्बन निधी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत (pawanraje urban nidhi patsanstha president prahlad sawant) यांनी आत्महत्या केल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. दरम्यान बँक घोटाळ्याने गाजत असणाऱ्या बीड जिल्ह्यात एका पतसंस्थेच्या अध्यक्षाच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. (Maharashtra News)

प्रल्हाद सावंत यांची परळी शहरात पवनराजे अर्बन निधी ही पतसंस्था आहे. त्यांनी रात्री आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. परळी शहरातील प्रेम प्रज्ञा नगर येथील एका अपॉर्टमेंटमध्ये प्रल्हाद सावंत यांनी काही दिवसापूर्वीच घर खरेदी केले होते.

या घरात अद्याप ते राहयलाही गेले नव्हते. याच घरात त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. त्यांच्या खिशात कागदपत्रे सापडले आहेत. यातून आत्महत्येचे कारण पुढे येण्याची शक्यता आहे. परळी पोलीस पुढील तपास करत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut Press Conference : जागा वाटपावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; सांगितले मविआच्या जागांचे सूत्र

Gold Silver Price: सोनं ७८००० वर पोहचलं; दिवाळीआधीच सोने-चांदीला झळाळी

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

SCROLL FOR NEXT