dog  अरुण जोशी
महाराष्ट्र

तुमच्या घरी कुत्रा असेल तर सावधान; कुत्र्यांमध्ये पसरतोय 'हा' जीवघेणा आजार!

अरुण जोशी

अरुण जोशी

अमरावती: तुम्ही घरात कुत्रा पाळला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण मोकाट व पाळीव कुत्र्यांवर विविध आजार आढळून येत आहेत. सध्या कुत्र्यांना एका आजारानं ग्रासले असून या आजारांच नाव पार्वो व्हायरल इन्फेक्शन आहे. यातून कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होत आहे. सध्या तालुका हा सर्दी, खोकला, ताप अशा संसर्ग आजारामुळे फनफनतो आहे. गेल्या महिन्याभऱ्यापासून वायरल आजाराचे रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी गर्दी करत आहे, अशातच आता पाळीव, मोकाट कुत्र्यांवर कैनाईन पार्वोव्हायरस (Canine parvovirus) आजाराची लक्षणे आढळून येत आहे, शहरातील पशु रुग्णालयात शेकडो कुत्र्यांवर गेल्या काही दिवसात उपचार करण्यात आल्याची नोंद आहे. (Amravati News In Marathi)

आज साधारणपणे पाहिले तर प्रत्येकाच्या घरात एक पाळीव कुत्रा दिसून येतो, माणसाच्या राहणी प्रमाणेच घरातील पाळीव कुत्र्याला वागणूक दिले जाते, मग ते जेवणापासून तर उपचारा पर्यंत कुत्र्यांची देखबाल केली जाते मात्र सध्या कुत्र्यांवर विविध आजार आढळून येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, कोरोना महामारीनं जग आधीच त्रासलं असून पक्ष्यावरील बर्ड फ्लू सारख्या आजाराने देखील हैराण झाले होते, जिल्ह्यात रोज कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांमध्ये घसा दुखणे, ताप सर्दी खोकला असे विविध आजार आढळून येत आहे, इतकेच काय प्राणीमात्रांवर देखील आजाराची लक्षणे दिसून येत आहेत.

हे देखील पहा-

कैनाईन पार्वोव्हायरसमुळे (Canine parvovirus) गेल्या दीड महिन्यापासून तिवसा शहरातील पशु रुग्णालयात रोज जवळपास 7 ते 8 कुत्र्यांवर उपचार केले जात आहे, कालपर्यंत जवळपास 80 कुत्र्यांमध्ये पार्वो आजाराची लागण झाल्याची नोद आहे, त्यामुळे शहरातील मोकाट कुत्र्यांमुळे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकरता येत नाही,आपण घरात कुत्रा पाळला असेल तर लहान मुलांना कुत्र्यांपासून दूर ठेवून काळजी घेण्याची गरज आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT