parshuram ghat, mumbai goa highway,  saam tv
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway : परशुराम घाट वाहतुकीसाठी राहणार बंद

पावसाळ्यात घाटातील वाहतुक हाेती बंद.

अमोल कलये

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या घाटात गेल्या वर्षभरापासून चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान घाट केव्हापासून बंद ठेवायचा ते अद्याप निश्चित झालेले नाही. (Parshuram Ghat Latest Marathi News)

पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव जवळपास महिनाभर घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. आता पाऊस थांबला आहे. त्यामुळे घाटातील चौपदरीकरणाचा भराव आणि रुंदीकरणाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी घाटातील वाहतूक पुन्हा काही दिवस बंद ठेवण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरु आहे.

याबाबत अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मात्र तसे नियोजन राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीकडून केले जात आहे. परशूराम घाट (parshuram ghat) केव्हापासून बंद ठेवायचा, ते अद्याप निश्चित झालेले नाही. मात्र घाटातील वाहतूक बंद ठेवून चिरणीमार्गे वाहतूक वळवण्याचे ठरले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLA car accident : बुलढाण्यात आमदाराच्या कारचा भीषण अपघात, २५ वर्षाचा तरूण कोमात

Navratri Rules: नवरात्रीत कांदा-लसूण का खाऊ नये? जाणून घ्या कारण

चिकन खाल्लं, बेसीन धुण्यावरून राडा; MPSC करणाऱ्या मुलींची हाणामारी, ४ जणींनी रूम पार्टनरला भींतीवर आदळून चोपलं

Maharashtra Live News Update: एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी धनगर समाज बांधवांचे बीडमध्ये आंदोलन

Momos Recipe: मैदा नाही तर गव्हापासून बनवा पौष्टिक मोमोज, सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT