Raj Thackeray In Parli Court : चीतावणीखोर वक्तव्याबद्दल परळी (बीड) न्यायालयाने बजावलेल्या वाॅरंट नंतर आज (बुधवार) मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे स्वत: न्यायालयीन कामकाजासाठी परळी आले आहेत. परळी न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश ए. एस. शर्मा यांच्यासमोर सुनावणीस प्रारंभ झाला आहे. ठाकरे यांच्या वकिलांनी मांडलेल्या म्हणण्यानंतर न्यायालयाने राज ठाकरे यांना पाचशे रुपयांचा दंड ठाेठावत अजामीनपात्र वाॅरंट रद्द केले.
राज ठाकरे यांना एका प्रकरणात सन (2008 मध्ये) मुंबईत अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर त्याचे पडसाद परळीत उमटले होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. त्यावेळी बसचे नुकसान झाले होते. याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांवर आणि चिथावणी दिल्याबद्दल मनसे (mns) प्रमुख राज ठाकरे यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या सुनावणीस आज ठाकरे हे परळी न्यायालयात आले.
राज ठाकरेंकडून मुंबई हायकोर्टचे वकील राजेन शिरोडकर यांनी काम पाहिले. त्यांना परळी कोर्टाचे ऍड. अर्जुन सोळंके, हरिभाऊ गुट्टे यांनी सहकार्य केले. यावेळी वकिलांनी राज हे आजारी असल्याने त्याचबरोबर त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात एक शस्त्रक्रिया झाल्याने ते सहा महिने येऊ शकले नाहीत, मात्र आज ते स्वतःहून हजर राहिले आहेत असा युक्तीवाद केला.
यावेळी न्यायालयाने मेडिकल कागदपत्रे दाखल करण्याची सूचना केली. दरम्यान न्यायालयाने राज ठाकरेंना पाचशे रुपयांचा दंड ठाेठावत वारॅंट रद्द केले. (Breaking Marathi News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.