Walmik karad Saam tv
महाराष्ट्र

Protest in Parli : वाल्मिक कराडला मकोका, कोठडी; आईला आली चक्कर, परळी बंद, सकाळपासून काय काय घडलं?

Santosh Deshmukh Case: परळी शहर अचानक कडकडीत (Parli bandh news) बंद. आज मकरसंक्रांत असल्याने बाजार पेठा गर्दीने सजली होती. मात्र वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्याची माहिती मिळताच परळी बंदची हाक समर्थकांनी दिली आहे.

Namdeo Kumbhar

Walmik Karad Protest in Parli News : वाल्मीक कराड समर्थक सकाळपासूनच आक्रमक झाले आहेत. परळीमध्ये निदर्शने करण्यात येत आहे. समर्थकांनी टॉवर, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. एका महिलेनं तर अंगावर रॉकेल टाकत स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. परळीत सुरू असलेल्या आंदोलनात वाल्मीक कराडचे कुटुंबीया सहभागी झाले. वाल्मीक कराड याच्या ७५ वर्षीय आई, बायकोही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. परळीमध्ये सकाळपासूनच तणावाचे वातावरण आहे.

वाल्मीक कराड समर्थकांनी सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि मनोज जरांगे यांच्या फोटोला चपाला मारत आपला रोष व्यक्त केला. परळीमध्ये सध्या तगडा बंदोबस्त आहे, कराड समर्थक आक्रमक झाले आहेत. काही समर्थकांनी टायर पेटवले, आंदोलन अधिक तीव्र होण्याआधीच पोलिसांनी टायर विझवले. एकीकडे बीड जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश दिले असतानाच हे आंदोलन सुरू आहे.

परळी बंदची हाक -

वाल्मीक कराड याला १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आज कराडला केज कोर्टात हजर करण्यात आले होते. कराड याच्या वकिलाने जामीन मागितला पण कोर्टाने सरकारी बाजू एकत १४ दिवसाची कोठडी सुनावली. वाल्मीक कराड याला मकोका लावल्यानंतर समर्थक आक्रमक झाले. परळीबंदची हाक देण्यात आली आहे. परळीमधील सर्व दुकाने बंद झाले आहेत. वाल्मीक कराड समर्थकांकडून टायर जाळत आपला रोष व्यक्त केला. परळीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे.

परळी शहर अचानक कडकडीत बंद. आज मकरसंक्रांत असल्याने बाजार पेठा गर्दीने सजली होती. मात्र वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्याची माहिती मिळताच परळी बंदची हाक समर्थकांनी दिली आहे. यामध्ये मुख्य बाजारपेठ मोंढा,टावर,बाजार समिती रोड, बस स्टँड रोड , बंद करण्यात आलाय.

वाल्मीक कराड याच्या आईला चक्कर -

मुलासाठी आई मैदानात उतरली आहे. वाल्मीक कराड याची ७५ वर्षीय आईने परळीतील पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून आंदोलन केले. पोलीस ठाण्यासमोर हजारोंच्या संख्येने जमाव जमा झाला होता. 75 वर्षीय पारुबाई बाबुराव कराड यांनी सकाळपासून परळी शहर पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिला. दुपारी पारुबाई यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना चक्कर आली. दरम्यान, वाल्मीक कराड यांच्या पत्नीही परळीतील आंदोलनात सहभागी झाल्या.

आत्मदहनाचा प्रयत्न -

वाल्मीक कराड समर्थक परळीत आक्रमक झाले. दोन महिलांनी स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. परळीत एका युवतीने अंगावर रॉकेल घेऊन स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. तिला वाचवण्यात आले. तर महिला समर्थकांकडून अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहण्याचा प्रयत्न केला.धक्कादायक म्हणजे, परळी पोलीस स्टेशन बाहेरच महिलांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला.

टॉवर, कमानीवर चढत आंदोलन, परळीत तणाव

वाल्मीक कराड यांच्या समर्थकांनी सकाळपासूनच परळीमध्ये आंदोलन केले. काही जणांनी टॉवरवर चढत आंदोलन केले. काही समर्थकांनी टायर पेटवत आपला रोष व्यक्त केला. तर काही समर्थकांनी घोषणाबाजी केली. परळीच्या वैजनाथ मंदिर परिसरात असणाऱ्या कमानीवर चडून कराड समर्थकांनी आंदोलन केले. परळीमध्ये सध्या प्रचंड तणाव आहे.

कराड समर्थक आक्रमक -

काही आक्रमक कराड समर्थकांनी टायर पेटवले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत टायर विझवले. टॉवरवर चढत आंदोलन करताना कराड समर्थकांमधील एक आंदोलक बेशुद्ध पडला, त्याच्यावर उपचार करण्यात आले. परळीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे. परळी बंदची हाक देण्यात आली आहे. बीडमध्ये जमावबंदीचे आदेश असताना परळीत आंदोलन पुकारण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT