satara agitation by pardhi samaj near shambhuraj desai bunglaow saam tv
महाराष्ट्र

Satara News : गृहराज्यमंत्र्यांच्या घरासमाेर पारध्याचा आत्महत्येचा प्रयत्न

आज दुपारच्या सुमारास अचानक पारधी समाजातील लाेक पाेवई नाक्यावर एकत्र आले.

ओंकार कदम

सातारा : पारधी समाजावर पोलीस अन्याय करतात असा आरोप करीत आज (साेमवार) पारधी समाजातील काही लाेकांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या सातारा (satara) घरासमाेर गोंधळ घातला. दरम्यान या ठिकाणी एकाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची प्राथमिक महिती समोर आली आहे. दरम्यान येथे गाेंधळ घालणा-यांना पोलिसांनी (police) तात्काळ ताब्यात घेतले आहे. (satara breaking marathi news)

शहरातील पोवई नाका येथे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचा कोयना-दौलत बंगला आहे. येथे आज दुपारी दीडच्या सुमारास अचानक पारधी समाजातील काही पुरुष व महिलांनी गोंधळ घालत राडा केला.

या प्रकारामुळे पाेवई नाका परिसरातील आणि शहरातील नागरिकांची मंत्री देसाईंच्या घरासमाेर गर्दी झाली. त्यामुळे तेथील मुख्य चाैकातच वाहनांची काेंडी झाली. पारधी समाजावर पोलीस अन्याय करतात असा आरोप पारधी समाजातील लाेक गोंधळ करताना करीत हाेते. पोलिसांनी संबंधितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे बंगल्यात नव्हते. ते मुंबईत अधिवेशनासाठी गेल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT