परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात मोठी घटना घडली आहे. मंदिराचा सभा मंडप कोसळून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 32 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सभा मंडप कोसळल्याने या मलब्याखाली 30 ते 40 जण दबल्याची माहिती मिळत आहे. मानवत तालुक्यातील यशवाडी येथे हे हनुमान मंदिर आहे. प्रशासनाकडून तत्काळ बचावकार्य सुरु करण्यात आली आहे. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सर्व यंत्रणा पाठवली घटनास्थळी पाठवली. अनेक अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
यशवाडी हे जागृत देवस्थान आहे. आजूबाजूच्या जिल्ह्यातून दर शनिवारी लाखो भाविक येत असतात. सकाळपासूनच भाविकांची मंदिरात मोठी गर्दी होती. मुख्य मंदिरासमोरील सभागृहात दर्शन, कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन सुरू होते. शेकडो भाविक या सभागृहात उपस्थित असतानाच अचानक दुपारी सभागृहाचे छत कोसळले. छत कोसळल्याचा मोठा आवाज होताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.
सभामंडपात काही भाविक हनुमान मंदिरासमोर हात जोडून उभे होते. त्यावेळी परिसरात सुरू असलेल्या सभा मंडपाच्या बांधकामाचा एक मोठा भाग अचानक पत्त्यासारखा कोसळला. पिलर आणि छताचा राडारोडा थेट खाली उपस्थित असलेल्या भाविकांवर पडला. या राडारोड्यात अनेक भाविक दबले गेले. अचानक छत कोसळल्यानं भाविकांना बाहेर पडता आले नाही. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहचले. मात्र मंदिराचा रस्ता अरुंद असल्याने बचाव पथकाला घटनास्थळी पोहचण्यात मोठी कसरत करावी लागली होती. सध्या स्थानिकांच्या आणि बचाव पथकाच्या मदतीने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.