Unique Wedding News: Saamtv
महाराष्ट्र

Parbhani News: चक्क स्मशानभूमीत लग्नगाठ बांधून केली 'नव्या संसाराला' सुरुवात; आदर्श विवाह सोहळ्याची जिल्ह्यात चर्चा

Unique Wedding News: परभणी जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण बघायला मिळाली. स्मशानभूमीत चक्क थाटामाटात अनोखा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.

राजेश काटकर

Parabhani Wedding News:

 स्मशानभूमी म्हंटल की तिथे अंत्यसंस्कार आणि दुःखाचे आवाज कानी पडतात. मात्र परभणी जिल्ह्यातील एका स्मशानभूमीत मंगलाष्टकांचे सूर आणि अक्षतांसोबत आनंदाची उधळण बघायला मिळाली. स्मशानभूमीत चक्क थाटामाटात अनोखा विवाह सोहळा पार पडला असून या विवाह सोहळ्याची राज्यभरात मोठी चर्चा होत आहे.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील सुंदर, अविस्मरणीय क्षण असतो. प्रत्येकजण आपले लग्न कायम आठवणीत राहण्यासाठी अनेक हटके प्रकार असतात. लग्नासाठी हटके डेस्टिनेशन, आलिशान हॉल शोधत असतात. मात्र परभणी जिल्ह्यातील एका जोडप्याने चक्क स्मशानभूमीत लग्नगाठ बांधली आहे. या हटके, आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

स्मशानभूमी म्हटलं की सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये भिती निर्माण होते. त्यामुळेच परभणी शहरातील स्मशानभूमीमध्ये साईनाथ जाधव आणि लक्ष्मी मिरेवाड सर्वसामान्य नागरिकांच्या मनामधील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सात जन्माची गाठ बांधली आहे. नागरिकांच्या मनामध्ये असलेली भीतीचे वातावरण दूर करणे हाच उद्देश असल्याने त्यांनी या ठिकाणी लग्न केले असल्याचे नातेवाईक सांगत आहेत.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून वारंवार अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र समाजामध्ये अंधश्रद्धा कायमच असल्याने स्मशानभूमीमध्ये लग्न करण्याचा निर्णय या दोन्ही परिवारांनी घेतला आहे. स्मशानभूमीमध्ये लग्न लावून समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. या विवाह सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)


सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT