Parbhani Crime News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Crime News : मन हेलावून टाकणारी घटना.. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पित्यानेच केले चार महिन्याच्या बालकावर चाकूने वार

मन हेलावून टाकणारी घटना.. पत्नीच्या चारित्र्यावर संशयातून पित्यानेच केले चार महिन्याच्या बालकावर चाकूने वार

राजेश काटकर

परभणी : पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन जन्मदात्या पित्यानेच आपल्या चार महिन्याच्या मुलावर चाकूने वार केला. ही मन हेलावून टाकणारी घटना (Parbhani) परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथे घडली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतविरोधात पिंपळदरी पोलीस (Police) ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. व्‍यंकटी कंकरे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपी बापाचे नाव आहे. (Breaking Marathi News)

परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथील कल्पना हिचा विवाह नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील पेनुर येथील व्‍यंकटी राम कंकरे यांच्यासोबत झाला होता. विवाहानंतर (Marriage) त्या प्रसूतीसाठी माहेरी आल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांनी एका गोंडस मुलांना जन्म दिला. सदरील मुलगा चार महिन्याचा झाल्यानंतर पती व्यंकटी कंकरे हे गंगाखेड तालुक्यातील गुंडेवाडी येथे आले. यावेळी त्यांची पत्नी कल्पना कंकरे या मुलाला दूध पाजत असताना कल्पना यांना तुला झालेला मुलगा माझा नाही; असे म्हणत थापड बुक्क्यांनी मारहाण करून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती व्यंकटी कंकरे यांनी चार महिन्याच्या मुलाच्या पोटावरच्या चाकूने वार केले.

चाकूने वार केल्यामुळे चार महिन्याच्या मुलाच्या पोटातील आतडे बाहेर पाडले. चार महिन्याच्या मुलावर वार केल्यानंतर व्‍यंकटी कंकरे त्या ठिकाणाहून (Crime News) पळून गेला. गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच दरम्यान मुलाची आई कल्पना कंकरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी पतीविरोधात पिंपळदरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पिंपळदरी पोलीस ठाण्याच्या पथकाने आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT