Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकले; रस्त्यांसाठी ठाकरे गट आक्रमक

Parbhani News : परभणी शहरातील रस्त्यांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ८२ कोटींचा निधी मंजूर केला होता.

राजेश काटकर

परभणी : परभणी शहरातील रस्त्यांची अवस्था खराब आहे. ठाकरे सरकार असताना निधी मिळाला होता. (Parbhani) मात्र या निधीला स्थगिती मिळाल्याने रस्त्याचे काम होऊ शकले नाही. यामुळे ठाकरे गटाची शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली असून आज पीडब्ल्यूडीच्या कार्यालयाला टाळे ठोको आंदोलन करत कुलूप लावण्यात आले. (Latest Marathi News)

परभणी शहरातील रस्त्यांसाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी ८२ कोटींचा निधी मंजूर केला होता. मात्र कालांतराने सरकार बदलले आणि शिंदे सरकारने त्या ८२ कोटींच्या निधीवर स्थगिती आणून परभणीच्या जनतेवर अन्याय केला आहे. अनेकदा मागणी करूनही निधी मिळत नसून रस्त्यांची दुरुस्ती होत नाही. परभणी रस्त्याच्या प्रश्नावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील आणि शिवसेनेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) टाळे ठोकण्यात आले आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रस्त्याचा प्रश्न तात्काळ निकाली काढा 

रस्त्याच्या प्रश्नावर ठाकरे गट आक्रमक झाला असून रस्त्यांचा प्रश्न तात्काळ निकाली काढवा; अशी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यानी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT