Maratha Resevation Saam tv
महाराष्ट्र

Maratha Resevation: आरक्षणच नाही तर शाळेतही जाणार नाही; शाळा सोडून विद्यार्थी उपोषणस्थळी

Parbhani News : आरक्षणच नाही तर शाळेतही जाणार नाही; शाळा सोडून विद्यार्थी उपोषणस्थळी

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षण मिळावे यासाठीची मागणी आता जोर धरू लागली असून आंदोलन देखील (Maratha Reservation) अधिक तिव्र होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. या आंदोलनात आता जिल्हा परिषद शाळांमधील (ZP School) विद्यार्थी देखील उतरत असून आरक्षण नाही तर शाळेतही जाणार नाही. अशी भूमिका घेत विद्यार्थी उपोषणस्थळी पोहचले आहेत. (Live Marathi News)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून वाघाळा गावात लिंबा गटातील दहा- बारा गावचे मराठा समाज बांधव २५ ऑक्टोबर पासुन साखळी उपोषण करत आहेत. परभणी जिल्ह्यातील वाघाळा येथे उपोषण सुरू असल्याने या ठिकाणी मराठा आरक्षण समर्थनार्थ होत असलेल्या घोषणाबाजीने विद्यार्थी प्रेरीत होत आहेत. आज येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी अचानक वर्गाबाहेर आल्याने शिक्षकांना काही कळलेच नाही. यावर बाहेर कुठे जाता असा प्रश्न शिक्षकांनी विचारताच चिमुकल्या विद्यार्थिनीने मन हेलाऊन टाकणारे उत्तर दिले. या विद्यार्थ्यांनी चक्क छत्रपती शिवरायांचे स्मारक गाठून या ठिकाणी बसलेल्या आंदोलनात जाऊन आरक्षण समर्थनार्थ घोषणाबाजी करत आज पासुन शाळेत न जाण्याचा निर्धार केला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाले विद्याथीं  

आम्हाला जर आरक्षण (Maratha Aarkshan) मिळणार नसेल तर आम्ही शाळा शिकुन तरी काय करणार? आमचे मायबाप राणात राबराब राबतात. आमच्यासह जगाला खायला घालतात. आम्ही मुलांनी खुप शिकावं मोठ्ठ व्हावं ही त्यांची इच्छा पण कितीही मार्क घेतले, तरी आम्ही घरीच राहातो. त्यापेक्षा शिक्षण न घेता त्यांच्यासोबत काम केलेलं बरं आम्ही शाळेतून चाललो. आम्ही नाय येणार आता हीउव्दिग्न प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी दिली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Gulab Jamun Recipe : सणासुदीला खास बनवा रताळ्याचे गुलाबजाम, १० मिनिटांत खाण्यासाठी तयार

Transferred : ऐन दिवाळीत पुणे महापालिकेत खळबळ, सहाय्यक आयुक्तांची उचलबांगडी, तिघांचे निलंबन, नेमकं प्रकरण काय?

Bank Holidays: सोमवारी बँका बंद की सुरू राहणार? वाचा आठवडाभराच्या सुट्ट्यांची यादी

Raghav Juyal : आर्यन खानच्या चित्रपटाने राघव जुयाल झाला मालामाल, ५ मजली आलिशान बंगला बांधतोय

SCROLL FOR NEXT