Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : रेशन दुकानावर दिलेल्या साडी, पिशव्यांची केली होळी; परभणी जिल्ह्यात नागरिक संतप्त

Parbhani News : शासनाच्यावतीने रेशन दुकानामार्फत दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्यांमधून मोदी सरकारची हमी म्हणत साडी आणि मोफत धान्य देण्यात येत आहे.

राजेश काटकर

परभणी : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील महिलांना रेशन दुकानावर साडी व मोफत धान्य देण्यात येत आहे. मात्र (Parbhani) या साड्या जुन्या वापरलेल्या असल्याचा आरोप करत नागरिकांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कान्सुर येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर (Ration) साडी व पिशवीची होळी करण्यात आली. (Maharashtra News)

शासनाच्यावतीने रेशन दुकानामार्फत (Ration Shop) दारिद्र्य रेषेखालील कुटूंबातील महिलांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्यांमधून मोदी सरकारची हमी म्हणत साडी आणि मोफत धान्य देण्यात येत आहे. दरम्यान रविवारी पाथरी (Pathari) तालुक्यातील कान्सुर येथे छत्रपती शिवरायांच्या स्मारकासमोर या पिशव्यांमध्ये जुन्या वापरलेल्या साड्या दिल्या जात असून या पिशव्यांवर भारत सरकारचा लोगो लहान असून मोदीजींचा मोठा फोटो देण्यात आला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हा प्रकार निवडणुकीचा जुमला असल्याची संतप्त भावना नागरीकांमधून व्यक्त करत या पिशव्या आणि साड्यांची होळी करण्यात आली. जुन्या आणि फाटक्या साड्या देऊन जनतेची फसवणूक आणि चेष्टा सुरू असल्याची भावना ग्रामस्थ आणि महिला व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यातील विजेची मागणी २५ हजार मेगावॉटच्या उंबरठ्यावर

Actor Shekhar Suman: शेखर सुमनचा भाजपात प्रवेश? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

US-Iran War: अमेरिकेचे इराणवर 7 तास बॉम्ब हल्ले; होर्मुझ सामुद्रधुनीत पुन्हा युद्धाचा भडका

Thursday Horoscope: खर्चावर नियंत्रण ठेवा, 5 राशींच्या व्यक्तींच्या व्यवसायात होणार भरभराट ; वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Healthy Food : ब्राऊन की व्हाईट, कोणता ब्रेड शरीराला हानिकारक? वेळीच सावध व्हा नाहीतर...

SCROLL FOR NEXT