Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : रेल्‍वे रुळांवर आलेल्‍या ५० मेंढ्यांचा मृत्‍यू; परभणी तालुक्यातील घटना

Parbhani Railway Latest News : रेल्‍वे रुळांवर आलेल्‍या ५० मेंढ्यांचा मृत्‍यू; परभणी तालुक्यातील घटना

राजेश काटकर

परभणी : परभणी तालुक्यातील मिरखेल ते पिंगळी दरम्यान रेल्‍वे ट्रॅकवर मेंढ्या आल्‍या. याच दरम्‍यान रेल्‍वे (Railway) आल्‍याने रेल्वेखाली ५० मेंढ्यांचा मृत्यू झाला. पहाटे साडेतीनच्या सुमारास (Parbhani) ही घटना घडली असून मेंढपाळांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. (Maharashtra News)

परभणी तालुक्यातील तट्टू– जवळा येथील तुकाराम गलांडे व पिंगळी येथील बाळासाहेब भुमरे हे मेंढपाळाचा व्यवसाय करतात. रात्री शेतामध्ये मेंढ्यांचा कळप बसवला होता. परंतु, मध्यरात्रीच्‍या सुमारास या मेंढ्यांपैकी जवळपास ५० मेंढ्या या फिरत फिरत रेल्वे रुळांवर गेल्या. पहाटे साडेतीनच्या सुमारास पिंगळी ते मिरखेल दरम्यान धावणाऱ्या रेल्वेखाली या मेंढ्या आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

मेंढपाळांचे आठ लाखाचे नुकसान

सकाळी मेंढपाळ जेव्हा या मेंढ्यांचा शोध घेत होते. तेव्हा त्यांना या मृतावस्थेत असलेल्या मेंढ्या रेल्वे रुळांच्या दोन्ही बाजूने आढळून आल्या. या दोन्ही मेंढपाळांचे जवळपास सात ते आठ लाखाचे नुकसान झाले असून परिसरामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून मदत करावी, अशीच अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Express Mumbai To Solapur: मुंबई ते सोलापूर प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार? पाहा किती आहे तिकीट?

Maharashtra News Live Update: भोंदू बाबा मनोहर भोसले याचा आणखी एक कारनामा समोर

राज्यात एकनाथ शिंदेंची ताकद आणखी वाढणार, अख्खा पक्षच शिवसेनेत विलीन होणार?

Vande Bharat: मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये मोठा बदल, प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी

पुढच्या आठवड्यात बारावीचा निकाल, दहावीच्या रिझल्टवरही अपडेट, mahresult.nic.in वर पाहा

SCROLL FOR NEXT