Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : परभणी विभागातील बसफेऱ्या आजही बंद; मराठा आंदोलनाचा परिणाम

Parbhani News : परभणी विभागातील बसफेऱ्या आजही बंद; मराठा आंदोलनाचा परिणाम

राजेश काटकर

परभणी : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आंदोलनाचे तीव्र पडसाद राज्यात (Maratha Reservation) उमटत आहेत. दरम्यान आंदोलनाला हिंसक वळण आल्याने अनेक ठिकाणी बसची जाळपोळ व दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे परभणी (Parbhani) जिल्ह्यातील बससेवा सलग दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात आली आहे. (Tajya Batmya)

राज्यामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असल्याने तीव्र पडसाद उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) गाड्यांची तोडफोड होऊ नये आणि नुकसान होऊ नये; यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागातील सातही आगारातील वाहतूक कालपासून बंद करण्यात आली आहे. आजही वाहतूक बंद असल्याने प्रवाशांना सकाळपासून गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या परभणी विभागामध्ये (St Bus) परभणी आणि हिंगोली असे दोन जिल्हे येत असल्याने या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांना आता प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. जोपर्यंत पोलीस अधीक्षकांकडून वाहतूक सुरळीत करण्याच्या सूचना मिळत नाहीत, तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नसल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT