Parbhani Selu Taluka News Today  Saam TV
महाराष्ट्र

Parbhani News: परभणीत ज्येष्ठ नागरिकाने संपवली जीवनयात्रा; मन हेलावून टाकणाऱ्या घटनेनं अख्खं गाव हळहळलं

Parbhani Selu News: विठ्ठल मोरे आपल्या कुटुंबासहित देवगावफाटा गावापासून काही अंतरावच असलेल्या स्वतः च्या शेतातील शेतआखाड्यावर राहत होते.

राजेश काटकर

Parbhani Selu Taluka News Today

परभणी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने शेत आखाड्यावर असलेल्या वडाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवलं. सेलू तालुक्यातील देवगावफाटा परिसरात गुरुवारी (१ फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. विठ्ठल मुरारी मोरे (वय ६०) असं मृत व्यक्तीचे नाव आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, विठ्ठल मोरे आपल्या कुटुंबासहित देवगावफाटा (Parbhani News) गावापासून काही अंतरावच असलेल्या स्वतः च्या शेतातील शेतआखाड्यावर राहत होते. काबाडकष्ट करून ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. बुधवारी नेहमीप्रमाणे ते शेतातून काम करून घरी आले.

रात्रीच्या जेवणानंतर विठ्ठल आणि त्यांचे कुटुंबीय झोपी गेले. गुरुवारी पहाटे कुटुंबियांना विठ्ठल मोरे आढळून आले नाहीत. त्यांनी शोधाशोध घेतली असता, घरासमोरच असलेल्या वडाच्या झाडावर त्यांचा मृतदेह आढळून आला. (Latest Marathi News)

घरातील कर्ता व्यक्तीच जग सोडून गेल्याने कुटुंबातील सदस्यांनी हंबरडा फोडला. मोरे यांच्या आत्महत्येची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. गावकऱ्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

विठ्ठल मोरे अत्यंत कष्टकरी शेतकरी होते. गावात कुठल्याही व्यक्तींसोबत त्यांचा वाद नव्हता त्यांच्या मनमिळावू स्वभावाने गावातील अनेकांची त्यांच्यासोबत मैत्री होती. दरम्यान, मोरे यांनी इतकं टोकाचं पाऊल का उचललं असावं? अशी चर्चा गावभर सुरू होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT