Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : शासकीय योजनांचा लाभ हवा असल्यास आई- वडिलांना सांभाळा; बोरी ग्रामपंचायतीचा अनोखा ठराव

Parbhani News : ग्रामपंचायतीअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात असतो. ग्रामीण भागात सर्वचजण या योजनांचा लाभ घेत असतात.

राजेश काटकर

परभणी : अनेक मुलं ही आपल्या आई- वडिलांना उतार वयात एकटे टाकत असतात. त्यांचा सांभाळ करत नाही. मात्र (Gram Panchayat) ग्रामपंचायतींमार्फत राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ आई- वडिलांचा सांभाळ करणाऱ्यालाच लाभ मिळणार असल्याचा अनोखा ठराव (Parbhani) परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीने केला आहे. (Latest Marathi News)

 ग्रामपंचायतीअंतर्गत विविध शासकीय योजनांचा लाभ दिला जात असतो. ग्रामीण भागात सर्वचजण या योजनांचा लाभ घेत असतात. मात्र बोरी ग्रामपंचायतीने शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी अट घातली आहे. या अटींचे पालन करणाऱ्यालाच योजनांचा लाभ मिळणार असल्याचा ठराव देखील सर्वानुमते करण्यात आला आहे. असा ठराव करणारी बोरी ग्रामपंचायत परभणी जिल्ह्यातील एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

जे मूल आपल्या जन्मदात्या आई- वडिलांचा सरत्या वयात सांभाळ करणार नाही, त्यांची काळजी करणार नाही; अश्या मुलांसाठी परभणीच्या जिंतूर (Jintur) तालुक्यातील बोरी ग्रामपंचायतीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. सरत्या वयात मुलांनी आई-वडिलांना सांभाळले तरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचा ठराव ग्रामपंचायतीने एकमताने घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT