parbhani accident at jintur road saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident : झरी-जिंतूर मार्गावर हिट अँड रन; भीषण अपघातात बहीण-भावाचा जागीच मृत्यू

Parbhani hit and run accident jari jintur road : परभणीत भीषण अपघातात सख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेनंतर दुचाकीला धडक देणाऱ्या कारचा चालक पसार झाला आहे.

Nandkumar Joshi
  • परभणीत भीषण अपघात

  • झरी ते जिंतूर मार्गावर दुचाकी-कारची समोरासमोर धडक

  • सख्या बहीण-भावाचा मृत्यू

  • अपघाताच्या घटनेनंतर कारचालक पसार

विशाल शिंदे, परभणी | साम टीव्ही

दुचाकीवरून निघालेल्या बहीण आणि भावाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. परभणी जिल्ह्यातील झरी शिवारात हा अपघात झाला. या घटनेनंतर कारचालक पसार झाला आहे.

झरी- जिंतूर मार्गावर कॅनलजवळ हा अपघात झाला. यात सख्ख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. झरी शिवारात कॅनलजवळ कार आणि दुचाकीत समोरासमोर धडक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, शीतल महादेव व्यवहारे (वय २३) आणि तिचा भाऊ राम महादेव व्यवहारे (वय २१) हे दोघे दुचाकीवरून जात होते. हे दोघेही झरीकडून जिंतूरच्या दिशेने जात असताना कॅनलजवळ पोहोचले. त्याचवेळी जिंतूरकडून झरीकडे वेगाने आलेली कार दुचाकीला धडकली. दुचाकी आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत शीतल आणि राम हे दोघे बहीण-भाऊ गंभीर जखमी झाले.

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आले. काही वेळाने रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. अपघाताच्या ठिकाणी स्थानिक नागरिक पोहोचले होते. त्यांच्या मदतीने शीतल आणि राम या दोघांना रुग्णवाहिकेतून परभणी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी या दोघांना तपासून मृत घोषित केले.

अपघातानंतर कारचालक फरार

झरी-जिंतूर मार्गावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. या धडकेत शीतल आणि राम या दोघा बहीण-भावाचा मृत्यू झाला. दुचाकीला धडकलेल्या कारचा चालक या घटनेनंतर पसार झाला. वृत्त हाती येईपर्यंत कारच्या चालकाबाबत कोणतीही ठोस माहिती मिळू शकलेली नव्हती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET नंतर राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT