Parbhani News Saam tv
महाराष्ट्र

Parbhani News : ९ किमीच्या रस्त्यासाठी ८ कोटींचा खर्च; महिनाभरातच हाताने उखडला जातोय रस्ता video

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी ते सिरसम बडवनी रोड एक महिन्यात ग्रामस्थ हाताने उखडत आहेत.

राजेश काटकर

परभणी : नव्याने करण्यात आलेल्या ९ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे गंगाखेड तालुक्यात पाहण्यास मिळत आहे. तब्बल ८ कोटी खर्च करून तयार करण्यात आलेला हा रास्ता एका महिन्यात खराब झाला आहे. ग्रामस्थ हाताने या रस्त्यावर टाकलेले बारीक खडी व डांबर काढत असल्याने रस्ताचे काम निकृष्ट दर्जाचे दर्जाचे झाल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. तर गंगाखेड तालुक्यातील सर्वच रस्त्याची हीच परिस्थिती असल्याचे देखील ग्रामस्थांनी सांगितले. 

परभणी (Parbhani) जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील माखणी ते सिरसम बडवनी रोड एक महिन्यात ग्रामस्थ हाताने उखडत आहेत. तब्बल नऊ किलोमीटरच्या रस्तासाठी आठ कोटी खर्च लागला आहे. या रस्त्याचे काम जून महिन्यातच पूर्ण झाले आहे. गंगाखेड तालुक्यात विकास निधीसाठी हजारो रुपये शासनाकडून मंजूर झाले असून सगळ्या तालुक्यात सार्वजनिक बांधकाम विभागातील इंजिनियर व अधिकाऱ्याच्या नातेवाईकांनी गुत्तेदाराची कामे सुरु केली आहेत. रस्त्याचे (Gangakhed) अंदाजपत्रक (इस्टीमेट) अवाच्या सव्वा फुगविली आहेत. त्यातच निकृष्ट दर्जाची कामे होत बिले काढली जात आहेत. असाच रस्ता हरगुळ ते खादगाव दरम्यानचा आहे. 

हरगुळ ते खादगाव दरम्यान तयार करण्यात आलेल्या रस्त्याच्या कामाची चौकशीची मागणी सातत्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष बालाजी मुंढे यांनी केली असून शासनाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही. आता माखणी ते सिरसम बडवनी रोड एक महिन्यात खराब झाल्याने कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचे पुन्हा समोर आले आहे. यामुळे होणारे विकास कामे व रस्त्याची चौकशीची मागणी शिवसेने, मनसे व ग्रामस्थांनी केली असून चौकशी झाली नाही; तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT