चोर सोडून संन्याशाला फाशी! गंगाखेड नगर पालिका प्रशासनाचा कारभार राजेश काटकर
महाराष्ट्र

चोर सोडून संन्याशाला फाशी! गंगाखेड नगर पालिका प्रशासनाचा कारभार

परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे रविवारी गटारीनिमित्त नगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये बिर्याणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यासह राज्यभर या पार्टीची जोरदार चर्चा झाली.

राजेश काटकर

परभणी : परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे रविवारी गटारीनिमित्त नगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहामध्ये बिर्याणी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यासह राज्यभर या पार्टीची जोरदार चर्चा झाली. नगरसेवकांसह नगरपालिका कर्मचारी यावेळी बिर्याणीवर ताव मारत असताना सीसीटीव्हीत कैद झाले होते.

हे देखील पहा -

या पार्टीचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असताना नागरपालिका प्रशासन या घटनेची सारवासारव करत आहे. दरम्यान, माध्यमांनी बातमी प्रसारित केल्या नंतर मुख्यधिकारी लोमटे यांनी कारवाई सुरू केली खरी मात्र, संबंधित नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असताना नगरपालिका प्रशासनाकडून केवळ एका सफाई कामगाराला खुलासा नोटीस दिली आहे.

चोवीस तासात खुलासा सादर करण्याची त्यांनी पत्राद्वारे सूचना केली आहे. दरम्यान, परभणीत नुकत्याच दाखल झालेल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून कठोर कारवाई होणे अपेक्षित असतांना ही अपेक्षा ही फोल ठरलीय. जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी या प्रकरणात लक्ष घातले नाही. त्यामुळे नगर पालिका प्रशासनाकडून थातुरमातुर कारवाई करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे मुख्याधिकाऱ्यांच्या पत्रावरून दिसून येते. त्यामुळे चोराला सोडून संन्याशाला फाशी देण्याचा हा प्रकार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sarva Pitru Amavasya 2026: सर्वपितृ अमावस्येला 'या' ७ वस्तू घरात आणू नका; जाणून घ्या धार्मिक मान्यता

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

SCROLL FOR NEXT