parbhani crime news  saam tv
महाराष्ट्र

भरदिवसा पूर्ववैमनस्यातून तरुणाची हत्या; परभणीतील खळबळजनक घटना

परभणीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. परभणीच्या (Parbhani) जिंतूर शहरातील बलसा चौकात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

परभणी : परभणीतून धक्कादायक बातमी समोर येत आहे. परभणीच्या (Parbhani) जिंतूर शहरातील बलसा चौकात पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना घडली आहे. सायंकाळच्या सुमारात ही घटना घडली. जिंतूर परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी या घटनेचा पुढील तपास सुरू केला आहे. (Parbhani crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मिर्झा अफरोज बेग, सोमेश्वर चिकटे, योगेश दहिवाल आणि यश राठोड हे चार मित्र बलसा रोडवरील एका धाब्यावर बसलेले होते. त्यांना शहरातील एका परिसरातील पाच ते सात जणांच्या गटाने फोनवर संपर्क साधून बलसा चौकात बोलावून घेतले. ते बलसा चौकात आल्यानंतर दोन्ही गटात पूर्ववैमनस्यातून शाब्दिक बाचाबाचीस सुरुवात झाली. काही क्षणातच शाब्दिक भांडणाचे रुपांतर हे उग्ररूप धारण केल्यानंतर एका गटाने २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याच्या पोटात आणि त्याचे मित्र सोमेश्वर चिकटे याच्या हातावर धारदार शास्त्राने वार केले व घटनास्थळावरून पोबारा केला.

धारदार शस्त्राने झालेल्या हाणामारीत २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याचा जागीच मृत्यू (Death) झाला तर सोमेश्वर चिकटे गंभीररित्या जखमी झाला आहे. मृतदेह रुग्णालयात दाखल केल्यानंतर संतप्त नागरिकांनी रुग्णालयाच्या साहित्याची तोडफोड केली. काही क्षणातच रुग्णालय परिसरात मोठा जमाव जमा झाला होता. पोलिसांनी रुग्णालयात जमलेल्या जमावाला पांगविले. फरार झालेल्या मारेकरुंना तात्काळ अटक करा अन्यथा मृतदेहाचा शवविच्छेदन करू देणार नाही असा आक्रमक पावित्रा घेऊन मयताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे रुग्णालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधारास मालेगाव संगमेश्वर येथे बेड्या

राज्यात सूर्य आग ओकणार; कुठे किती तापमान? वरुणराजा कुठे बरसणार?

kidney disease - सावधान! 'हे' दोन सामान्य आजार गपचूप खराब करत आहेत तुमची किडनी; सुरुवातीला दिसतच नाहीत लक्षणे

Sunday Horoscope: मेषसह या 3 राशींसाठी आजचा दिवस खास; कामात यश, मिळणार आनंदाची बातमी

हॉकी संघाने इतिहास घडवला! टीम इंडियानं आशियाई क्रीडा स्पर्धेत पाचव्यांदा जिंकलं सुवर्णपदक

SCROLL FOR NEXT