Parbhani Accident Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident : अज्ञात वाहनाची मोटारसायकलला धडक; दोघांचा मृत्यू

Parbhani News : दोघेजण असोला गावातुन असोला पाटीवर येथे आले होते. या दरम्यान कोणत्या तरी वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

राजेश काटकर

परभणी : पूर्णा तालुक्यातील असोला पाटीवर सायंकाळच्या सुमारास मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात (Accident) दुचाकीवरील आसोला गावातील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची (Parbhani) घटना घडली. या घटनेमुळे आसोला गावात शोककळा पसरली आहे.  (Live Marathi News)

परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असोला पाटीवर मोटरसायकलला अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने मोटरसायकलवरील दोन तरुणांचा मृत्यू झाला. दत्ता अनंतराव जावळे (वय २८) व विशाल ज्ञानोबा भरोसे (वय २०) असे अपघातात मृत झालेल्या तरुणांचे नावे आहेत. दोघेजण असोला गावातुन असोला पाटीवर येथे आले होते. या दरम्यान कोणत्या तरी वाहनाने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातानंतर सदर वाहनचालक वाहन घेऊन पसार झाला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात येत होते. मात्र दवाखान्यात जात असताना विशाल भरोसे यांचा वाटेतच तर उपचारादरम्यान दत्ता जावळे यांचा मध्यरात्री मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच, ताडकळस पोलिस ठाण्याचे या अपघाताची नोंद झाली असून ताडकळस पोलिस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : बायपासवर भीषण अपघात! ३ वाहनांची जोरदार धडक, ४ जणांचा होरपळून मृत्यू

१६ महिन्यांत ३६ जणांना मृत्युदंड, 'त्या' न्यायाधीशांची तडकाफडकी कौटुंबिक न्यायालयात बदली

Maharashtra News Live Update: जुन्या कसारा घाटात वाहतूक कोंडी

Tikhat Sev Recipe: दिवाळीला फराळ करताना घरी बनवा कुरकुरीत आणि झणझणीत तिखट शेव, वाचा रेसिपी

Drinks for Liver Health: यकृतावर घाणेरडी चरबी जमा झालीये? हे ६ ड्रिंक्स लिव्हर डिटॉक्स करण्यास ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT