Parbhani Accident News: Saam tv
महाराष्ट्र

Parbhani Accident News: परभणीत भरधाव ट्रकची बैलगाडीला धडक, अपघातात आजी आणि नातीचा जागीच मृत्यू

Parbhani Accident News: सोनपेठ-शेळगाव या राज्य महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे.

राजेश काटकर

Parbhani Accident News:

परभणीत भीषण अपघाताची घटना घडली आहे. परभणीत ट्रक आणि बैलगाडीत झालेल्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोनपेठ-शेळगाव या राज्य महामार्गावर ही अपघाताची घटना घडली आहे. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, परभणीतील सोनपेठमधील शेतातून घरी परतणाऱ्या बैलगाडीला ट्रकने दिलेल्या आजी-नातीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

बुधवारी सायंकाळी झालेल्या सोनपेठ-शेळगाव या राज्य महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. कापसाची वाहतूक करणाऱ्या बैलगाडीतील दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या अपघातात राधाबाई बालासाहेब वाकडे (४५) त्यांची नात आराध्या अमोल कापसे (९) यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तर बैलगाडीतील इतर 1 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात ४५ वर्षीय उषाबाई व्यंकटी आव्हाड यांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथे पाठविण्यात आले आहे.

तर यासोबत अविष्कार अमोल कापसे (१०) वर्ष दत्ता भंडारे (३५), राजामती दत्ता भंडारे (३५) असे तिघे जण किरकोळ जखमी झाले आहेत. या किरकोळ जखमी झालेल्यांना सोनपेठमधील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ragda Pattice Recipe : संडे स्पेशल चटपटीत स्नॅक्स, स्ट्रीट स्टाइल रगडा पॅटीस 'असे' बनवा घरी

BCCI Awards : रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे, शुभमन गिल ठरला सर्वात मोठ्या पुरस्काराचा मानकरी; BCCI ची घोषणा

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या मनपुर वर्तुळात वनपालाचा होरपळून मृत्यू

तीन वेळा आमदार राहिलेल्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने दिला राजीनामा; पक्षाला मोठं खिंडार

Lucky Signs on Feet Soles: हाताप्रमाणे पायावरही असते भाग्य रेषा; 'हे' चिन्ह असेल तर नशीबात आहे राजयोग

SCROLL FOR NEXT