Devendra Fadanvis News Saamtv
महाराष्ट्र

Devendra Fadanvis News: सकाळी एक भोंगा सुरू होतो अन्... 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमात फडणवीसांची फटकेबाजी

Shasan Aplya Dari: महाराष्ट्र सरकारचा 'शासन आपल्या दारी कार्यक्रम' आज परभणीमध्ये पार पडत आहे. कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

Gangappa Pujari

राजेंद्र काटकर, प्रतिनिधी...

Parabhani News: महाराष्ट्र सरकारचा शासन आपल्या दारी कार्यक्रम आज परभणीमध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. वसंतराव नाईक मराठा कृषी विद्यापीठात होत असलेल्या या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले. तसेच विरोधकांवरही टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

परभणीच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाची माहिती दिली. तसेच राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची यादीही वाचून दाखवली. कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले.

"आमचे विरोधक सकाळपासून रात्रीपर्यंत टीकाच करतात. सकाळी ९ वाजता एक भोंगा सुरू होतो आणि रात्री १० वाजेपर्यंत दुसरे भोंगे सुरू असतात. माझा यांना सवाल आहे. आमच्यावर पाहिजे तेवढी टीका करा, आम्ही टीकेला घाबरत नाही. पण विकासाच्या मुद्द्यावर बोला." असे ते यावेळी म्हणाले.

"मुख्यमंत्र्यांचं (Eknath Shinde) परभणीवर प्रेम आहे. काळजी करु नका. येत्या काळात परभणीचं चित्र बदलेले दिसेल. यावेळी मुख्यमंत्र्यांना उद्देशून मुख्य रस्त्यांना काँक्रिटच्या रस्त्यात बांधलं पाहिजेत असेही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. तसेच समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर ते गोवा असा शक्तिपीठ महामार्ग करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT