Panvel News Saam tv
महाराष्ट्र

Panvel News : इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरी; शटर तोडून युवकाने चोरले ५४ मोबाईल

Panvel News : नवी मुंबईच्या पनवेलमधील एका मोबाईल शॉपमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. या युवकाने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

पनवेल : इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणाऱ्या युवकाजवळ महाविद्यालयाची फी भरण्यासाठी पैसे नव्हते. यामुळे फी भरण्याची अडचण होती. हि अडचण सोडविण्यासाठी तरुणाने मोबाईल दुकानातून तब्बल ५४ मोबाईल चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे.  

नवी मुंबईच्या (Panvel) पनवेलमधील एका मोबाईल शॉपमध्ये मोबाईल चोरीची घटना घडली होती. या युवकाने रात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून आतमध्ये प्रवेश केला. यामध्ये त्याने मोबाईल चोरून नेले. हा प्रकार सकाळी दुकान उघडल्यानंतर लक्षात आला. यानंतर चोरीबाबत पोलिसांना (Police) माहिती देण्यात आली. नवी मुंबई गुन्हे शाखेने सिसीटीव्ही आणि तांत्रिक तपास सुरु करत एका युवकाला चोरी केल्याप्रकरणी अटक केली. 

तरुणाने दिली कबुली  

तपासा दरम्यान सदर तरुण हा इंजीनियरिंगच्या शेवटच्या वर्षात असून महाविद्यालयाची फी भरण्यासाठी त्याने मोबाईल शॉप दुकानात चोरी केल्याचे कबूल केले. इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी चोरट्याने ही चोरी केली असून हे महागडे मोबाईल विकून तो फी चे पैसे भरणार होता. पोलिसांनी चोरट्याकडून 41 मोबाईल जप्त केले असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राहुल गांधी मांजरीत विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

UP Accident News : महामार्गावर भीषण अपघात; डंपरमध्ये अडकून ५० मीटर फरफटत गेली कार, आई-वडिलांसह दोन मुलांचा मृत्यू

PF Privacy : कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! खासगी कंपन्या तुमचा PF-ITR डेटा पाहू शकतात का? वाचा...

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

SCROLL FOR NEXT