Panvel Crime Saam tv
महाराष्ट्र

Panvel Crime : कस्टम विभागाने जप्त केलेल्या मालावरच दरोडा; पोलीसांकडून एकजण ताब्यात

Panvel News : पनवेलच्या कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरल्याने गोडाऊनमध्ये माल ठेवण्यात आला सदरच्या गोडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी सुमसाम असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरोडा टाकला आ

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे

पनवेल : पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील वेयर हाऊस मधील कस्टम विभागाने कारवाई करत जप्त केलेला माल ठेवण्यासाठी भाड्याने गोडाऊन घेतले आहे. भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या मालावरच दरोडा टाकण्यात आला आहे. याठिकाणी उभ्या करण्यात आलेल्या ट्रकमधून ३० ते ३५ दरोडेखोरांनी दरोडा टाकत तब्बल ५० टन सुपारी आणि मिरी हा माल चोरी केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. 

पनवेलच्या कस्टम विभागाकडून कस्टम ड्युटी न भरल्याने गोडाऊनमध्ये हा सर्व माल ठेवण्यात आला होता. याठिकाणी मोठ्या प्रमाणात माल आणून ठेवण्यात आलेला असतो. दरम्यान सदरच्या गोडाऊनमध्ये रात्रीच्या वेळी सुमसाम असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरोडा टाकला आहे. ट्रकमध्ये असलेला सुमारे ५० टन सुपारी व मिरी चोरट्यानी लंपास केली आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून शोध सुरु केला. 

१ कोटी ८० लाखाचा माल जप्त 

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर पोलिसांनी तपासाला गती देत भिवंडी येथून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून सुमारे १ कोटी ८० लाख रुपये किंमतीची सुपारी आणि मिरी हा माल रिकव्हर करण्यात आला आहे. तर आणखी चोरट्यांचा शोध पोलिसांकडून सुरु करण्यात आला आहे.  

मुख्य सूत्रधार फरार 

दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटक करण्यात आली असली तरी या घटनेचा सूत्रधार अद्याप फरार असून शहरात एवढा मोठा दरोडा पडला असल्याने पोलीसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर याच गोडाऊनमध्ये तिसऱ्यांदा चोरीची घटना घडल्याने कस्टम अधिकाऱ्यांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

11th Admission: 11 वी प्रवेशाचा गोंधळ कुणामुळे? सलग दुसऱ्या दिवशी वेबसाईट ठप्प

Diesel Crisis: इंधनाचा पुरेसा साठा, तरीही का होतोय राडा? पेट्रोल पंपांवर रांगा आणि हाणामाऱ्या; पाहा VIDEO

Budh Gochar: 29 मे रोजी बुध करणार स्वराशीत प्रवेश; या 3 राशी एका रात्रीत बनणार गडगंड श्रीमंत

रुग्णाला ४ वेळा उपाशी ठेवून ऑपरेशन रद्द; उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयाचा भोंगळ कारभार

Dombivali: ८ वर्षांचे प्रेम, प्रेमी युगुलांनी कोर्टात लग्न केलं, मुलीच्या कुटुंबीयांनी सर्वांसमोर लग्न लावतो म्हणत नेलं अन्...

SCROLL FOR NEXT