Pune Crime: किरकोळ वादातुन प्रियकराने केला प्रेयसीचा खून Saam Tv
महाराष्ट्र

Panvel News : लग्नाचा तगादा लावला म्हणून प्रेयसीचा आला राग; प्रियकराच्या कृत्याने पनवेलमध्ये खळबळ

महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Panvel crime News : पनवेल तालुक्यातील धामणी गावाजवळ असणाऱ्या उड्डाणपुलाखाली आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाचा छडा लावण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलं आहे. मृत महिलेच्या नवीन विशिष्ट ब्रँडच्या चपले वरून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. नवी मुंबई गुन्हे शाखेने ही मोठी कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

मिळाल्या माहितीनुसार, पनवेलमधील (Panvel) अज्ञात मृतदेह असल्याने मृतदेहाची ओळख पटत नव्हती. अखेर मृत व्यक्तीने घातलेली नवीन ब्रँडेड चप्पल कुठे भेटते या दुकानाची माहिती काढली. त्या दुकााना दुकानाचे सीसीटीव्ही तपासले असता आरोपी हा बॉडी बिल्डर असल्याचे निदर्शनास आले.

यावरून सर्व जिममध्ये माहिती घेतली असता घणसोली येथील एका जिम मध्ये आरोपी ट्रेनर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. तसेच आरोपीच्या मोबाईल क्रमांकावरून त्याच्या साथीदाराचा देखील सुगावा लागला.

असा झाला हत्येचा उलगडा?

मुख्य आरोपी रियाज खान आणि सह आरोपी इम्रान शेख याच्या अटकेनंतर केलेल्या चौकशीत मयत महिलेचे नाव उर्वशी वैष्णव असे असून ती नेरुळ येथील एका बार मध्ये कामाला होती. तिचे मुख्य आरोपी रियाज खान सोबत प्रेमसंबंध सुरु होते.

उर्वशी वारंवार लग्नाचा तगादा लावत असल्याने तिची रियाजने आपला साथीदार इम्रानच्या सहकार्याने रशीने गळा आवळून उर्वशीची हत्या करुन मृतदेह धामणी गावाजवळील उड्डाणपूलाखाली फेकून दिला असल्याची माहिती दिली. याप्रकरणी नवी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnadurga Fort : रत्नदुर्ग किल्ल्याचे दुसरे नाव काय? 99% लोकांना नसेल माहिती

Kitchen Vastu Tips: किचनमधून आजच बाहेर काढा 'या' गोष्टी, पैशांची कमतरता होईल दूर

Maharashtra Live News Update: रांजणगावजवळ लोखंडी रोडने एसटी वाहकावर हल्ल्याचा प्रयत्न

Vande Bharat : महाराष्ट्रात किती वंदे भारत धावतात? जाणून घ्या संपूर्ण यादी अन् थांबे

Sara Ali Khan Boyfriend: सारा अली खान 'या' भाजप नेत्याच्या मुलालासोबत आहे रिलेशनशिपमध्ये?

SCROLL FOR NEXT